Monday 14 October 2024

दयाशंकर शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांचा अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा !!

दयाशंकर शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांचा अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा !!

**** सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यापुढे वाचला अनधिकृत बांधकामांचा पाढा 

मोहने, संदीप शेंडगे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दया शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेरील शेडवर कारवाई झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी अ प्रभाग  कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी सैनिकांनी अ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा त्यांच्यापुढे पाढाच  वाचला. तसेच आम्ही लेखी तक्रार देतो बघू किती अनाधिकृत बांधकामावर कारवाई होते असा प्रश्न विभाग प्रमुख सुरेश सोनार यांनी उपस्थित केला.

पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात शहाड बंदरपाडा अटाळी वडवली मानी आंबिवली मोहने यादव नगर विकास कॉलनी गाळेगाव मोहिली टिटवाळा आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून पालिकेचे भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही मात्र ऊन वाऱ्यापासून पावसापासून नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून कार्यालयाबाहेर वाहतुकीला कोणताही अडथळा नसलेले पत्र्याचे शेड पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव आणून पाडल्याचा आरोप दया शेट्टी यांनी केला आहे.
कारवाई बाबत सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना विचारले असता कारवाईदरम्यान आपण पालिका मुख्यालयात मीटिंग करिता उपस्थित होतो तक्रार असल्याने कर्मचाऱ्यांनी त्या शेडवर कारवाई केली असे रोकडे यांनी सांगितले.

यावेळी काशिनाथ तरे मार्केटचे अध्यक्ष लक्ष्मण तरे यांनी  सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्याकडे अधिकृत बांधकामांच्या तक्रारींचे निवेदन दिले तसेच या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. अनेक अनधिकृत बांधकामे आदिवासी वनविभागाच्या तसेच गुरु चरण जमिनीवर सुरू आहेत या सर्व अनाधिकृत बांधकामावर आपण कारवाई करणार का असा सवाल माजी नगरसेवक विजय आप्पा काटकर यांनी रोकडे यांना विचारला. मोर्चा झाल्यानंतर काही वेळातच अ प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विभागातील तसेच फेरीवाला पथकातील 15 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आल्याने दया शेट्टी यांच्या कार्यालयावरील कारवाई कर्मचाऱ्यांना भोवली असे काही कर्मचारी तबक्या आवाजात बोलत होते.

या संतप्त मोर्चा मध्ये एन आर सी कामगारांनी सहभाग घेतला होता. यावेळी विभाग प्रमुख सुरेश सोनार माजी नगरसेवक विजय आप्पा काटकर स्व. काशिनाथ तरे मार्केटचे अध्यक्ष लक्ष्मण तरे, संघटक शत्रुघ्न तरे, त्रिपाठी यांसह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...