Monday 14 October 2024

कंडोमपा शिक्षण विभागात आर टी ई प्रवेश प्रक्रियेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार !!

कंडोमपा शिक्षण विभागात आर टी ई प्रवेश प्रक्रियेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार !!

**आर टी ई प्रवेश प्रक्रियेत गोरगरिबांना डावलून धनदांड्यांना प्रवेश __

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारात शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि एका लिपिकाचा समावेश असल्याचा आरोप पालक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन बोराडे यांनी केला आहे. यामुळे शिक्षण मंडळाची कार्यप्रणालीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एससी आणि एसटी तसेच आर्थिक दुर्बल प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते तसेच आर टी ई प्रवेशाकरिता २५% जागा राखीव ठेवण्यात येतात या जागांवर राज्य सरकार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असते. नुकत्याच पार पडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवड झालेल्या पालकांना कागदपत्रांचे मूळ नकल पत्र घेऊन शिक्षण विभागात नोंद करावी लागते. याच नियमाच्या आधारे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंडळातील एक लिपिक यांनी मिळून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केली आहे. नामांकित आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या खाजगी शाळा भरलेल्या फॉर्मची चौकशी केली जाते पालकांनी भरलेल्या फॉर्मची फेर तपासणीच्या नावाने ते राहत असलेल्या पत्त्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण पाहणी करून घेतात.

पाहणी केल्यानंतर तुमच्या मुलाचे प्रवेश आरटीई अंतर्गत प्रवेश होऊ शकत नाही. तुम्ही आर्थिक संपन्न गटामध्ये मोडता तुमचे उत्पन्न जास्त आहे तुम्ही चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारावर काम करतात असे त्यांना सांगून घाबरविले जाते. श्रीमंत पालक तसेच आर्थिक संपन्न पालक आरटीई अंतर्गत झालेला प्रवेश रद्द होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना विनवणी करतात. काहीतरी करा त्यावेळी शिक्षणाधिकारी यांचा लिपिक पालकांकडे 50 हजार ते एक लाख रुपये मागितले जातात. या शाळेची फी दीड ते दोन लाख रुपये आहे. तूमचे आता पैसे जातील परंतु दहा वर्षे तुमचे पैसे वाचतील असे सांगून त्यांच्याकडून 50 हजार ते एक लाख रुपये उकळले जातात.
खाजगी शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांनी जोडलेली कागदपत्रांची माहिती शिक्षण मंडळाकडे मागितल्यास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खाजगी शाळेत ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची नावे तसेच त्यांनी जोडलेले कागदपत्रांची माहिती शिक्षण विभागाकडे नाही.

त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शिक्षण मंडळाच्या संपूर्ण कारभाराची एसआयटी मार्फत चौकशी करून आर्थिक व्यवहार करून घेतलेले आर टी प्रवेशाची पुनर चौकशी करण्याची मागणी बोराडे यांनी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला होणारं मतदान,तर लगेच २३ तारखेला होणार मतमोजणी ! भिवंडी, दिं,१६,अरुण पाटील ...