Friday, 4 October 2024

नवरात्र उत्सव सोहळ्याला आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे सुरुवात !!

नवरात्र उत्सव सोहळ्याला आंगवली सोमेश्वर ग्राम देवता मंदिर येथे सुरुवात !!

** भक्त आणि स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 

 कोकण  (शांताराम गुडेकर) :

           घटस्थापनेपासून दसरा सणापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो. आंगवली येथील सोमेश्वर या ग्राम मंदिरात नवरात्र उत्सव सोहळा दर वर्षीप्रमाणे चालू वर्षी संपन्न होत आहे. यावेळी सर्व लोकं एकत्र येऊन गुण्या गोविंदाने समरस होतात व आनंद घेतात.प्रत्येक दिवशी पूजा, आरती, गरबा नृत्य, विविध कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

           आंगवली सोमेश्वर मंदिर येथे  स्थापन झालेली ग्रामदेवतेची पालखी गुरुवारी मंदिरमध्ये सजली असून १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. रोज गरबा आणि भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भक्त जणांनी प्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आंगवली गावचे सर्व मानकरी, गावकर, सरपंच, पोलीस पाटील, मंदिर उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थांच्याकडून विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...