Monday 7 October 2024

तायक्वांदो खॆळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी !!

तायक्वांदो खॆळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

         हैद्राबाद येथील इंडस इंटरनेशनल स्कूल, शंकरापल्ले या शहरात आय.एस. एस.ओ. शालेय राष्ट्रीय तायक्वांदो पुमसे आणि क्युरोगी स्पर्धा पार पडली, येथे भारतातील जवळ जवळ २०-२२ विविध शाळांमधून २००-२५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्याचप्रमाणे मुंबई येथील प्रसिद्ध असलेली सिद्धकला तायक्वांदो  अकादमीतील खेळाडूंनी त्यांच्या शाळांचे प्रतिनिधीत्व केले असून पुमसे आणि क्युरोगी या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी बजावली आहे. पुमसे या प्रकारात वैयक्तिक पुमसे सुवर्ण पदक विजेते जयविर कोच्चर- धीरूभाई अंबानी स्कूल, कांस्य पदक विजेते दियान मेहता- जमनाबाई नरसी इंटरनेशनल स्कूल, व्योम बनसल - जमनाबाई नरसी इंटरनेशनल स्कूल, जोडी पुमसे रजत पदक विजेते जयविर कोच्चर-धीरूभाई अंबानी स्कूल, क्युरोगी या प्रकारात , आन्या भिमराजका - सुवर्ण पदक - बी. डी. सोमाणी इंटरनेशनल स्कूल, पूर्बादित्या मांडवरा - सुवर्ण पदक - छत्रभुज नरसी स्कूल, जयविर कोच्चर - धीरूभाई अंबानी स्कूल, दियान मेहता - रजत पदक - जमनाबाई नरसी इंटरनेशनल स्कूल, आर्णा राठी - कांस्य पदक - छत्रभुज नरसी स्कूल, कर्व परमार - कांस्य पदक - छत्रभुज नरसी स्कूल यांचा समावेश आहे तसेच या खेळाडूंचे प्रतिनिधीत्व सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ आणि त्यांचे सहप्रशिक्षक निशांत शिंदे, चंदन परिदा आणि यश दळवी यांनी केले.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...