Monday 7 October 2024

स्वाभिमान भारत कप १८ वे आमंत्रण ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये युवा कराटे खेळाडूंचे अभिमानास्पद यश !

स्वाभिमान भारत कप १८ वे आमंत्रण ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये युवा कराटे खेळाडूंचे अभिमानास्पद यश !

** सेंट जोसेफ हायस्कूल, जुहू मधील प्री-प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी विभागातील जिद्दी,मेहनती आणि समर्पित युवा कराटे खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
 
        सेंट जोसेफ हायस्कूल, जुहू मधील प्री-प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी विभागातील जिद्दी,मेहनती आणि समर्पित युवा कराटे खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी केलीआहे. प्रतिष्ठित "स्वाभिमान भारत कप," १८ वे आमंत्रण ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत त्यांनी अतूट समर्पण आणि जिद्दीचे प्रदर्शन केले.त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी उत्कृष्टतेच्या सततच्या धडपडीचे प्रतिक आहे, ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की, निर्धार, लक्ष आणि मनोधैर्य यांच्या जोरावर विद्यार्थी कोणतीही आव्हाने पार करू शकतात आणि यशाच्या नवीन शिखरावर पोहोचू शकतात.
           मुख्य प्रशिक्षक शिहान फ्राझ एस., तसेच सहायक प्रशिक्षक सेन्सी आशिष एस. आणि सेन्डाई श्रेया एस.आणि सेन्सई रितिका भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इतिहास रचला आणि अत्युत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांनी सर्वाधिक पदके जिंकत चॅम्पियनशिप ट्रॉफीवर कब्जा केला. ही अभूतपूर्व कामगिरी त्यांच्या कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन आहे. तसेच त्यांच्या प्रशिक्षकांच्या सशक्त मार्गदर्शनाने आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.
         यानिमित्ताने सन्मा.मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापक रेव्हरंड फादर सायमन लोपेझ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सततच्या प्रेरणादायी नेतृत्वाने आणि प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाचे आणि प्रगतीचे वातावरण मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे तयार झाले होते आणि स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित झाले होते. त्यांनी उत्कृष्टतेचे आणि निर्धाराचे खरे प्रतीक साकारले आहे.
        हा कार्यक्रम २ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रतिष्ठित प्रियदर्शिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड, मुंबई येथे झाला. या स्पर्धेत सुमारे ८०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा या ९ राज्यांतील स्पर्धकांनी एकत्र येऊन हा दिवस टॅलेंट, क्रीडाभिमान आणि एकतेच्या रंगात रंगवला.या विविधतेमुळे स्पर्धा एक अविस्मरणीय अनुभव ठरली आणि स्पर्धेच्या खऱ्या भावनेचे दर्शन घडले असे मत यानिमित्ताने व्यक्त करण्यात आले. तसेच प्रथमच जज म्हणून या स्पर्धामध्ये सेन्सई रितिका भोसलेने उतरून उल्लेखनीय कामगिरी केली.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...