Monday 7 October 2024

कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानमार्फत १४,१५ दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन !!

कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानमार्फत १४,१५ दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन !!

**ओंकार भोजनेसह अन्य  कलाकारांची उपस्थिती

जालगांव, प्रतिनिधी - दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात सर विश्वेश्वरया सभागृहात १४,१५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय प्रायोजित दापोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.कोळथरे येथील कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानमार्फत होणाऱ्या या कार्यक्रमात आमदार सौ.उमा खापरे, अभिनेता ओंकार भोजनेसह अन्य कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.
         १४ रोजी सायं ५.३० वा वारकरी दिंडीपासुन या कार्यक्रमाला सुरुवात होईल.यानंतर शिवचरित्रावर आधारित  ईथे माराठिचिये नगरी हा मंदार परळीकर निर्मित कार्यक्रम सादर होईल. १५ रोजी सायं ५.३० वा दापोलीतील स्थानिक लोककलेचे सादरीकरण व त्यानंतर जागतिक ख्यातीच्या गायिका मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.  
          या महोत्सवाला जोडून १४,१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते सायं ५.३० या वेळेत कै.कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरे मार्फत विविध कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या खालुबाजा, (जाखडी नृत्य) भजन,कोकणातील लोककला,चित्रकला तसेच नाट्यछटा, रिल्स, रांगोळी आणि फोटोग्राफी इत्यादीं स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली सांस्कृतिक महोत्सवाला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कै कृष्णामामा महाजन स्मृतीप्रतिष्ठान कोळथरे मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...