Sunday 6 October 2024

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !


कल्याण, सचिन बुटाला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाला आहे. 


पहिल्या टप्प्यामध्ये भगवा तलाव येथील आदेश्र्वर चौक ते विकास हाईटस् (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली. येत्या काळात आपल्या भागांत चांगला रस्ता मिळणार असल्याबद्दल या भागांतील नागरिकांनी आमदार भोईर यांचे मनापासुन आभार मानले आहेत.


यावेळी झालेल्या भूमीपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...