Sunday 6 October 2024

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का ; युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश !!

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का ; युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश !!

डोंबिवली, प्रतिनिधी : श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू सहकारी व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे युवासेना सचिव मा. नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सात मा. नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे (उ.ब.ठा.) गटात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीत एक वजनदार नेते अशी दिपेश म्हात्रे यांची ओळख असून यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे.

दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हाती घेऊन मशाल, घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकले होते. दिपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. 

कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. 

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...