Sunday 6 October 2024

वैजापुर गावात बालविवाह रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन !!

वैजापुर गावात बालविवाह  रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन !!

चोपडा, प्रतिनिधी :
     दिनांक 3/10/ 2024 रोजी वैजापुर गावात बालविवाह प्रतिबंधात्मक रॅलीचे व पथनाट्याचे आयोजन भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
       समाजकार्य महाविद्यालयाचे वैजापूर क्षेत्र कार्यप्रमुख प्रा. नारसिंग वळवी व शेनपाणी,मुळयाउतार या गावाचे क्षेत्र कार्य प्रमुख डॉ विनोद रायपुरे , प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदांणकर यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैजापूर गावात सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या दिसून आल्यात त्यामध्ये गरीबी, निरक्षरता, अंधश्रद्धा, आरोग्याच्या समस्या, काही प्रमाणात बालविवाह सारख्या वाईट प्रथा व विविध पायाभूत सुविधांच्या समस्या दिसून आल्यात त्या अनुषंगाने जनजागृतीचा एक भाग म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात आले. जनजागृती अभियान राबविण्याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात अनेक प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कायदे करण्यात आले मात्र आजही ही समस्या काही आदिवासी भागांमध्ये जैसे थे आहेत. ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे, दुसरा मार्ग म्हणजे समाजात जागृती निर्माण करणे, समाजात व पालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहेत.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रॅली व पथनाट्याद्वारे या वाईट प्रथेचे दुष्परिणाम प्रदर्शित करणे व समाजामध्ये जागरूकता आणण्याकरिता या महत्त्वपूर्ण भूमिकेतून बालविवाह वर विविध स्लोगन, रॅली काढून व पथनाट्य सादर केले. रायसिंग वसावे ,वसावे आसमा, हर्षल धनगर ,पाटील राज, झुरकाडे प्रतीक्षा, शुभम पाटील, वळवी ओशाल, वसावे पवन, नम्रता संजीवनी, आनंद पावरा, मावची नीलिमा,जागृती पावरा,बरकती पावरा या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
        रॅलीमध्ये वैजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री दत्ता पावरा, आदिवासी सेवक दयाराम बारेला, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ ईश्वर सौंदाणकर, वैजापूर कन्या शाळेचे शिक्षिका सौ. शबाना तडवी मॅडम, अधीक्षक सुहास देवराज, श्री आडे एस. बी., श्री. संदीप कावरके, भाग्यश्री बहारे  मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व कन्या आश्रम शाळेचे विद्यार्थिनी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...