Sunday, 17 November 2024

जनसामान्यांचे हिंदुत्ववादी महायुती सरकार पुन्हा येऊ दे - विश्वनाथ भोईर यांची बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना !!

जनसामान्यांचे हिंदुत्ववादी महायुती सरकार पुन्हा येऊ दे - विश्वनाथ भोईर यांची बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना !!

*शेवटच्या टप्प्यातही विश्वनाथ भोईर यांचा झंजावती प्रचार*

कल्याण, सचिन बुटाला दि. १७ :
जनसामान्य, महिला, कष्टकरी, शेतकरी आणि हिंदुत्वाचा विचार करणारे महायुतीचे हे सरकार पुन्हा येऊ दे आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय त्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी केल्याची भावना कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त भोईर भगवा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नतमस्तक झाले. आजच्या आपल्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी दर्शन घेतले. 

तर प्रचार रॅली आणि जाहीर सभांना सामान्य नागरिकांसह प्रतिष्ठीत नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता डॉक्टर्स, इंजिनियर्स यासारखे उच्च पदस्थ सहभागी होत असल्याबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटत आहे. न सांगता ही सर्व लोकं प्रचारात सहभागी होत असून याचाच अर्थ महायुतीचा विजय अंतिम टप्यात आहे. आता जनतेनी लोकांनीच पुन्हा महायुतीला निवडून देण्याचा निर्धार केल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराची रणधुमाळी थांबायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनीही अखेरच्या टप्प्यात झंजावती प्रचार कायम ठेवला आहे. आजच्या अखेरच्या टप्प्यात आधारवाडी, अन्नपूर्णा नगर,  वाडेघर, साई बाबा मंदिर, सापर्डे, हिऱ्याचा पाडा आदी परिसरी भव्य अशी रॅली काढण्यात आली. आधी काढलेल्या रॅलीप्रमाणेच आजही ठिकठिकाणच्या चौकांमध्ये या रॅलीचे जल्लेषात स्वागत करण्यात आले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, भाजपचे वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, भाजपच्या हेमा नरेंद्र पवार, प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशालीताई भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, रामदास कारभारी यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर !!

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या भेटी घेण्यावर उमेदवारांचा जोर !! घाटकोपर, (केतन भोज) : घाट...