कल्याण पश्चिमेत इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडताहेत - महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर
कल्याण दि.20 नोव्हेंबर :
आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान होत असून आपण सहकुटुंब मतदान केले आहे यावेळी सोबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील उपस्थित होते. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि नरेंद्र पवार यांची साथ पाहता कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचा विश्वास कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.
भोईर यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते __
कल्याणचा विकास करणे महायुती शिवाय कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे एवढ्या सकाळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. जनता महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणार हे जनतेकडून अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या २३ तारखेला महाराष्ट्रात महायुती मोठ्या ताकदीने महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल. आणि सर्वसामान्यांचे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
तर मतदान जनजागृती साठी सर्वच स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तसेच महायुती सरकारने केलेले काम पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते मतदारसुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला उतरलेले पाहायला दिसत आहेत. महायुतीने ज्या पद्धतीने काम केलं आहे लोकांना आशा आहे की हे जनतेचे सरकार सर्व सर्वांचे भलं करू शकते. त्यामुळे मतदारराजा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर रंग लावून मतदानासाठी उभा असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी विश्वनाथ भोईर त्यांच्या पत्नी वैशाली भाईर, मुलगा वैभव भोईर, विशाखा भोईर मुलगी, मानसी भोईर मुलगी बंधू प्रभूनाथ भोईर, सुप्रिया भोईर या सर्व कुटुंबियांनीही एकत्रितपणे आपला मतदानाचा हक्क बजावला.
No comments:
Post a Comment