Friday, 8 November 2024

सद्गुरू शंकर महाराज प्रकट दिन __

!! मैं कैलाश का रहनेवाला, मेरा नाम है शंकर !!

सद्गुरू शंकर महाराज प्रकट दिन __
 

नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात चिमणाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहात होते. शिवाचे भक्त चिमणाजींना एकदा स्वप्नात दृष्टान्त झाला की रानात जा तर तुला बाळ मिळेल त्याला घेऊन ये. ते दृष्टान्ताप्रमाणे इ.स. 1785 च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात गेले आणि त्यांना तिथे दोन वर्षांचा बाळ मिळाला. शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर असे ठेवले. शंकर हे माता-पिता यांच्याजवळ काही वर्षे राहून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले. श्री शंकर महाराजांना एक नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही.ते अनेक नावांनी वावरत. गौरीशंकर, नूर , गुरुदेव अशा नावानीही त्यांना ओळखले जातं. नावाप्रमाणेच त्यांचे रूपही अनेक, काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो.महाराजांचे डोळे मोठे होते आणि ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघे वर करुन बसण्याची विशेष पद्धत होती.खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते अशात ते कधी एका स्थानी थांबत नसत. त्रिवेणी संगम, अक्कलकोट, नाशिक, त्र्यंबकेश्र्वर, नगर, पुणे, औदुंबर, तुळजापूर, सोलापूर, हैद्राबाद, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची. श्री शंकर महाराज हे योगीराज होते ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका... त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते, ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते.ते म्हणत की मला जाती, धर्म काही नाही.ते सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. त्यांच्या शिक्षणाबद्दल कुणास ठाऊक पण काही देखावा करणार्‍या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. 
 
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत.
 
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत.ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत.सदगुरू शंकर महाराज म्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही.श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे.त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते.जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! हे त्यांचे वचन.स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज "मालक" म्हणत असत.योगिराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत.तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात.संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत.श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर येऊन आम्ही सुखावतो. आपल्या सद्गुरु माऊलीच्या दिव्य समाधीवर माझ्या हातून अनेक चमत्कार घडतात. अक्कलकोटातील अनेक मान्यवर व्यक्ती महाराजांच्या भेटीला येत, महाराजांची विभिन्न नयनरम्य रूपे पाहून नम्रतापूर्वक लीन होत असत.अशावेळी अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात श्री स्वामींची पुण्यतिथी व प्रगट दिन महाराज साजरे करायला विसरले नाहीत.योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, "पानी पीना छान के और गुरू करना जान के" पाणी जसे गाळून प्यावे,तसेच सद्गुरुची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबापोटी, भक्तांना माळ घालून नारळ हातात देऊन, त्याच्या कडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे व आपल्या सर्व रोगांवर उपाय सांगणारे,भक्तांचे बदलायचे ढोंगी नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणार्‍या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चीड होती.आपल्या आयुष्यात दहा हजार शिष्य करून चौदाशें वर्ष जगलेले चांगदेव आयुष्यभर कोरेच होते हे महाराजांना ज्ञात होते.आपण गुरूकडे धाव न घेता गुरूच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो.श्री स्वामी समर्थ पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पहात होते. गरज दोघांना होती. जगाच्या कल्याणाची !
 
भक्तांना ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २६ एप्रिल १९९४ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली.पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे.हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.

सद्गुरू शंकर महाराज प्रकट दिनाच्या सर्व शंकर महाराज भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा.!


सादरीकरण -
  - श्री.केतन दत्ताराम भोज
मराठी वृत्तपत्र लेखक संघ (कार्यकारिणी सदस्य)
भ्रमणध्वनी - ८३६९५५४४१८

No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...