Thursday, 14 November 2024

वडिलांसाठी मुलगा प्रचाराच्या मैदानात, ओम राम कदम यांचा वडिलांसाठी प्रचार !!

वडिलांसाठी मुलगा प्रचाराच्या मैदानात, ओम राम कदम यांचा वडिलांसाठी प्रचार  !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिमचे महायुतीचे उमेदवार राम कदम यांच्या विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन त्यांचे सुपुत्र ओम राम कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर आमदार सुपुत्र ओम राम यांनी विक्रोळी पार्कसाईट मधील प्रत्येक विभागात जाऊन तसेच तेथील नागरिकांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट घेऊन वडिलांचा प्रचार करीत आहेत. आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी ओम राम कदम हे प्रचाराच्या मैदानात उतरलेले दिसत आहेत. भाजपाचे घाटकोपर पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळे यांच्या मार्गदर्शाखाली यावेळी तुषार निर्मळ, प्रशांत कदम, नंदु पाटील सर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नवनाथ बाबा अहिरे व त्यांचे सर्व सहकारी व भाजप महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते राम कदम यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...