पुन्हा एकदा राम का नव्याने श्री गणेशा का दादापण होणार सिद्ध !!
घाटकोपर पश्चिम : तिरंगी लढत
घाटकोपर, (केतन भोज) : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघातली ही निवडणुक चुरशीची ठरली होती, यावेळी तर त्यापेक्षाही जास्त चुरश याठिकाणी दिसणार आहे. इथे भाजपाचे राम कदम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत विजयाची हॅट्रिक साजरी केलीय. ते चौथ्यांदा गड राखणार की? घाटकोपरवासीय येथे बदल घडवणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. घाटकोपरमध्ये संमिश्र समाजातील अन् बहुभाषिक लोकवस्ती आहे. चांगले रस्ते, वाहतूक कोंडी आणि झोपडपट्टी पुनर्वसन आदी मुद्दे प्रामुख्याने या मतदारसंघात दिसून येतात. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे राम कदम यांना एकूण ७०,२६३ मिळालेली होती तर अपक्ष राहिलेले संजय भालेराव यांना ४१,४७४ तर मनसेचे गणेश चुक्कल यांना एकूण १५,०१९ इतके मते मिळालेली होती, त्यावेळी ही अगदी भाजपचे राम कदम आणि अपक्ष राहिलेले संजय भालेराव या दोघांमध्ये काटेकी टक्कर दिसून आली होती, यामध्ये ही त्यावेळी भाजपचे राम कदम हे विजय झाले. तसेच आता ही याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, भाजपाचे राम कदम, मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात चुरसेची तिरंगी लढत होत आहे. या तिन्ही उमेदवारांनी विधानसभा क्षेत्रात जोरदार प्रचाराची सुरुवात केलेली दिसत आहे, तिघांनीही आपली पूर्ण ताकद या विधानसभेच्या निवडणुकीसाठी लावलेली दिसत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी ही आपापल्या उमेदवारांसाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. तसेच ही निवडणूक भाजपचे राम कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन टर्म आमदार राहिलेले भाजपचे राम कदम यांनी या मतदार संघातील नागरिकांसाठी आता पर्यंत धार्मिक यात्रा, वैद्यकीय मदत तसेच काही समस्या सोडवल्या असल्या तरी या मतदासंघातील स्थानिक जनता त्यांच्यावर हवी तशी समाधानी दिसत नाही आहे. त्यांनी फक्त धार्मिक यात्रा याच्यावर जास्त जोर दिलेला दिसत आहे, असे येथील मतदारांचे मत आहे.तर आताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय भालेराव यांनीही या मतदार संघातील बऱ्याच समस्या सोडवल्या आहेत अमृत नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची स्थापना केल्यानंतर शिवभक्त म्हणून त्यांची घाटकोपर मधील तरुणाई मध्ये चांगली छाप पडली होती त्यावेळी त्यांची घाटकोपर मधील तरुणाई मध्ये शिवभक्त संजय दादा या नावाने चांगली ओळख होती, त्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर त्यांनी जनसंपर्क कमी केल्यामुळे त्यांच्या दादा या नावाचे वलय याठिकाणी कमी झाले असे मत स्थानिक तरुणाई व्यक्त करताना दिसत आहे. तर इकडे आता मनसेचे उमदेवार गणेश चुक्कल यांनी ही अनेक सामाजिक कामे, धार्मिक यात्रा व मुख्य म्हणजे त्यांनी यंदाच्या नवरात्रीउत्सव काळात सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी मदत कॅम्प तसेच विधानसभा क्षेत्रातील तरुणाईच्या मागे उभे राहणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, मंडळांच्या पाठीशी उभे राहणे अशी कामे केली आहेत त्यामुळे त्यांची यावेळी तरुणाई आणि नागरिकांमध्ये ही चांगली छाप पडताना दिसत आहे. त्यांनी या निवडणुकीत पूर्वी पेक्षा चांगला जोर लावलेला दिसत आहे. त्यांच्या प्रचार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपर मध्ये सभा ही घेतली.
त्यामुळे या तिरंगी लढती मध्ये यंदा पुन्हा एकदा राम का नव्याने श्री गणेशा का दादापण होणार सिद्ध हे आता घाटकोपर पश्चिम ची जनताच ठरवणार आहे.
No comments:
Post a Comment