Thursday, 14 November 2024

प्रचिती गायकर राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्काराने सन्मानित !!

प्रचिती गायकर राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्काराने सन्मानित !!

विरार (पालघर) दि.१५ नोव्हेंबर : शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन चित्रकला स्पर्धा – २०२४’ या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल आजच्या बालदिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अ गटात (इयत्ता पहिली ते पाचवी) विरार येथील नरसिंह गोविंदराव वर्तक इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी प्राचिती गायकर हिला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
     या स्पर्धेसाठी शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथील कलाशिक्षक देविदास हिरे आणि जि. प. शाळा, आसबेवाडी येथील शिक्षक अमित भोरकडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक तसेच शिक्षक ध्येयच्या संपूर्ण संपादक मंडळाने या यशाबद्दल प्रचितीचे अभिनंदन केले असून परिसरात तिचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...