Monday, 11 November 2024

सामंत यांचा सत्ता आणि पैसा याच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा अजेंडा !!

सामंत यांचा सत्ता आणि पैसा याच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा अजेंडा !!

** महाविकास आघाडी सरकार आल्यावर साखरी नाटे सुजलाम सुफलाम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

आमदार राजन साळवी यांची ग्वाही

रत्नागिरी प्रतिनिधी, (केतन भोज) ; राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी झाली असून राजापूर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा उमेदवारी दिली आहे. प्रचाराच्या निमित्ताने गावे वाड्या वस्त्या फिरत असताना अनेक लोकांचा पाठिंबा, अनेक लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा मुस्लिम बांधवांनी सत्ताधारी पक्षाला कधीही सहकार्य केले नाही. मुस्लिम बांधव महाविकास आघाडी बरोबर राहिले आणि त्यामुळेच लोकसभेत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सतत मच्छीमारांवर अन्याय झाले.आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने वेळोवेळी माच्छिमारांचे प्रश्न विधानसभेत मांडत राहिलो. त्यावेळी सुद्धा ऍड. खलिफे मॅडम, उल्का ताई विश्वासराव, अजित यशवंतराव आणि आम्ही सगळे एकत्रितपण मच्छीमारांचे प्रश्न मांडत राहिलो. २००९ च्या दरम्याने जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनात आम्ही सहभागी झाली. तो प्रकल्प विनाशकारी होता मच्छीमारांवर अन्यायकारक होता. त्याकाळी मच्छीमारांची एकजूट आम्ही पाहिली आहे. त्या आंदोलन काळात काही मच्छीमारांसह आम्हाला सुद्धा जेल मध्ये जावे लागले होते. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आंदोलन, आयलॉग जेट्टीचे आंदोलन असेल त्यावेळी सुद्धा आपण एकजुटीने राहिलो. त्यामुळे ही २०२४ सलाची विधानसभेच्या निवडणुकीत मी तुमच्या कुटुंबातला आहे असे समजून जास्तीत जास्त मशाल या चिन्हावर बटण दाबून निवडून द्या असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी यावेळी केले. साखरी नाटे येथील बैठकीला आमदार राजन साळवी, ऍड. हुस्नबानू खलिफे, शिवसेना नेत्या उल्का विश्वासराव, विभाग प्रमुख नरेश शेलार, शाखाप्रमुख मजीद गोवळकर, राजापूरचे माजी नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे, माजी उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष बंड्या बाकाळकर, महंमद अली वाघु, माजी नगरसेवक नाना कुवेसकर,माजी पंचायत समिती सदस्या सौ.नलिनी शेलार, सरपंच श्रीम. गुलजार ठाकूर, उपसरपंच नौशाद धालवेलकर, नदीम तमके, नदीम कोतवडकर, बाबासाहेब वाडकर, मुईद खादू, तबरेज पेजे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात आमदार राजन साळवी म्हणाले की, उदय सामंत राष्ट्रवादीत होते. त्यावेळी पालकमंत्री भास्कर जाधव होते. त्यावेळी भास्कर जाधव यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांकडे लोटांगण घालून मंत्री झाले. त्यांचे सत्ता आणि पैसे हे जवळचे नाते आहे. शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता निवडून येऊ शकतं नाही तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून आमच्या शिवसेना पक्षात आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन परत मंत्री झाले. त्यांना आता वाटलं की राजापूरची माती जरा भुसभुशीत आहे म्हणून त्यांनी आपल्या भावाला निवडणुकीत उभे केले. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीतले अनेक मुस्लिम बांधव साखरी नाटे आणि आजूबाजूच्या मुस्लिम बहुल गावात फिरत आहेत. ते सांगत असतील मतदान भैय्यांना करा. पण आमची जनता काही मूर्ख नाहीये. जनता त्यांच्या बाजूला सुद्धा जाणार नाही. आम्हाला साहेबांनी शिकवण दिली आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. त्यामुळे आम्ही शिवसैनिक जनतेची सेवा करत राहिलो, तुमच्या सुख दुःखात सहभागी झालो. आता सुद्धा आम्ही परत निवडून आल्यानंतर साखरी नाटे गावांसाठी जास्तीत जास्त योजना आणू. हा गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करू. असा विश्वास यावेळी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

प्रचार फेरी दरम्यान गणेश चुक्कल लहान मुलांमध्ये रमले !!

प्रचार फेरी दरम्यान गणेश चुक्कल लहान मुलांमध्ये रमले !! **लहान मुलांना दिल्या बालदिनाच्या शुभेच्छा  घाटकोपर, (केतन भोज) ; घाटकोप...