अविनाश लाड पक्षातून निलंबित हुस्नबानू खलिफे यांची माहिती !!
लांजा,( केतन भोज) : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी पक्षादेश डावलून लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन साळवी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती माजी विधानसभा परिषद सदस्य हस्नुबानू खलिफे यांनी लांजा येथे पत्रकारांना दिली. शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे राजापूर विधानसभेचे राजन साळवी यांच्या प्रचारार्थ लांजा येथे आलेल्या माजी आमदार आणि विधानपरिषद सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या विधानसभा मतदारसंघात आघडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजन साळवी हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र असे असताना काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे आणि म्हणूनच काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजन साळवी यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तसेच तालुकाध्यक्ष राजेश राणे, महेश सप्रे, सुरेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment