कुणबी पदाधिकार्यांना डावलत असल्याने शांताराम मोरेबाबत समाजात नाराजी !!
(ता. 06/11/2024 ला दुपारी ठाकरे गटात प्रवेश झाला लगेच संध्याकाळी पांच वाजता त्यांच्या क्रेशर वर धाड टाकून हुकुमशाही - दडपशाही असे खालच्या दर्जाचे राजकारण करत कारवाई करण्यात आली, सर्व समाजातील मतदारांनी यांचा विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे)
भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील गोंदाडे येथील कुणबी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शरद पाटील यांच्या मुलाने उध्दव सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या खदान व्यवसायावर कारवाई झाल्या नंतर शिंदेसेनेचे भिवंडी ग्रामीणचे उमेदवार शांताराम मोरे यांच्यावर कुणबी समाजात नाराजी पसरली असताना आता शिंदे सेनेकडून महायुतीतील घटक पक्षातील कुणबी पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याने नाराजीत अधिक भर पडली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सोमवार दि.11 नोव्हेंबर रोजी अंबाडीनाका येथील सभेसाठी महायुतीतील कुणबी समाजातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिले नसल्याने शिंदेसेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या बद्दल कुणबी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कुणबी बहुल भाग असूनही अंबाडी येथील या सभेच्या ठिकाणी अनेक कुणबी पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बसवण्यात आले नाही. तर कोणाही कुणबी पदाधिकाऱ्याला भाषणासाठी संधी देण्यात आले नाही त्यामुळे शिंदे सेनेकडून मी समजले जात असल्याचे भावना निर्माण झाली आहे.
सध्या महायुतीत भाजपाकडून स्थानिक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव, दयानंद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते योगेश पाटील, शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, भिवंडी ग्रामीण महायुती समन्वयक तथा राष्ट्रवादीचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांसह अनेक पदाधिकारी असताना त्यांना या सभास्थानी त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे सेना कुणबी समाजाला चुकीची वागणूक देत असल्याची भावना निर्माण झाली आहे
No comments:
Post a Comment