Friday, 8 November 2024

घाटकोपर मध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश !!

घाटकोपर मध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली सभा पार पडली.घाटकोपर पश्चिमचे मनसेचे अधिकृत उमेदवार गणेश अर्जुन चुक्कल यांच्या प्रचार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सभा अतिशय महत्त्वाची ठरली. यावेळी घाटकोपर मधील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या प्रचार सभेत अनेकांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रभावित होऊन विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपले विचार आणि आपले मार्ग बदलून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्या उपस्थित जाहीर पक्ष प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश म्हणजे राज ठाकरे त्यांच्या विश्वासाचं आणि परिवर्तनाच्या आशेचं प्रतीक आहे असे यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी म्हटले. 

यावेळी प्रशांत हरिचंद्र चव्हाण (मुंबई प्रदेश उपाध्यक्ष) RPI (आठवले गट ), रेश्मा खोपकर (माजी महिला युवा मोर्चा अध्यक्ष घाटकोपर (प ) भाजपा), चेतन भाटकर (भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ), अमित तोरडमळ (भाजपा युवा मोर्चा ), विनोद सकट (शिवसेना उद्धव ठाकरे गट उपशाखाप्रमख प्रभाग क्रं. १२४), तसेच संदीप गिरकर (भाजपा मंडळ सचिव घाटकोपर ), बालाजी जाधव (कैकाडी समाज युवा नेता ), अमित गिरकर (शिवाजी नगर अध्यक्ष) गणेश उत्सव, अशोक बनसोडे (RPI) आठवले गट, निलेश जवरे (RPI) आठवले गट, संदीप चव्हाण (RPI), दिपक रोकडे (RPI), अक्षय बनसोडे (RPI), अमित काळोखे, अनिता जाधव (शिवसेना शिंदेगट ), मयुरी मसदे, माधुरी झेंडे, प्रज्ञा संसारे, दादासाहेब लेंडवे (उद्धव ठाकरे शिवसेना गट ), सिंड्रेला खेडेकर (शिंदे गट) इत्यादी विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी त्या सर्वांचे मनसे मध्ये स्वागत करण्यात आले. हा फक्त पक्ष प्रवेश नाही, तर एक नवा विश्वास, एक नवा जोश आणि एक नवा संकल्प आहे असे मत घाटकोपर मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...