Sunday, 12 January 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!


मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम मुंबई- 70 या रात्र विद्यालयात  शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली. 

सभेचे अध्यक्षस्थान शालेय समिती चेअरमन मा.श्री. बी. डी. काळे (संस्था कार्याध्यक्ष) हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी व समिती सदस्य म्हणून विनोबा भावे पोलीस स्टेशन कुर्ला पश्चिमच्या उपनिरीक्षक सन्माननीय योगिता लोंढे मॅडम उपस्थित होत्या. शालेय समितीचे सचिव रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर, समितीचे सदस्य श्री. शिवसेना नेत्या जयश्री गोठणकर,  शिवसेना उपाध्यक्ष त्रिमुखे मॅडम, समाजसेविका कविता मोरे, मासूम संस्थेचे प्रतिनिधी संकेत मोरे सर, पालक प्रतिनिधी खान, श्री दीपक मानकर, माजी विद्यार्थी प्रतिनिधी रुपेश गरड, विद्यार्थी प्रतिनिधी मनीषा परदेशी, कल्पना चव्हाण इ . उपस्थित होते. सभेची सुरुवात सरस्वती प्रतिमेच्या व पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा परिचय करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नंतर  पीएसआय योगिता लोंढे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून विद्यार्थिनींची सुरक्षितता किती महत्वाची आहे हे समजावले. समाजामध्ये आपण कसं वावरलं पाहिजे स्वतःचे संरक्षण आपण स्वतःने कसं केलं पाहिजे असे विविध प्रकारचे दाखले देऊन मार्गदर्शन केले. 

रात्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय विश्वनाथ राऊत सर यांनी शाळेय व्यवस्थापन समिती व शालेय व्यवस्थापन व विकास समिती यांचे मागील इतिवृत्त वाचून दाखवले व शाळेचे विकास करण्यासाठी आपणा सर्वांना पुढे यावे लागेल कारण मराठी माध्यमाच्या शाळा ह्या आता कमी होत चालल्या आहेत त्या भविष्यात टिकल्या पाहिजेत, त्या टिकाव्यात यासाठी जे गरीब गरजू , होतकरू व शिकण्याची आस असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य मिळवून देऊन त्यांचं शिक्षण दहावीपर्यंतचे पूर्ण करून, त्यांना योग्य शिक्षा देऊन, दहावीचा शंभर टक्के निकाल दरवर्षाप्रमाणे याही वर्षी लागला पाहिजे आणि पुढेही लागला पाहिजे तसेच समितीच्या सदस्यांना शाळेच्या विकासासाठी तत्पर राहण्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. आपली रात्र शाळा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत सगळ्यांनीच जागृत राहणे किती महत्त्वाचे आहे हे उपनिरीक्षक योगिता लोंढे मॅडम यांनी ज्याप्रमाणे समजावून दिले त्याचप्रमाणे आपण सुरक्षित राहिले पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना अधिक समजावून सांगितले गेले. पुढे त्यांनी स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत माहिती दिली.

ह्या सभेचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर नाईट रात्र विद्यालयातील शिक्षक श्री समाधान खैरनार सर, श्री योगेश वीरकर सर, श्री ओव्हाळ सर, शिक्षकेतर कर्मयोगी श्री प्रमोद गीते यांनी विशेष परिश्रम घेतले.

    या संपूर्ण सभांचे सूत्रसंचालन श्री. समाधान खैरनार सर यांनी केले तर आणि उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.



No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...