Sunday, 12 January 2025

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा धडाका !

प्रभाग क्रमांक १२३ मध्ये डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून विविध विकास कामांचा धडाका !

घाटकोपर, (केतन भोज) : विक्रोळी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३ मध्ये माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून प्रभागातील अनेक प्रलंबित समस्या आणि विकासकामे महापालिका व इतर ठिकाणी पाठपुरावा करून तसेच काही इतर स्वखर्चातून सोडवल्या जात आहेत. यामध्ये १२३ प्रभातील ज्या- ज्या विभागात समस्या असतील त्या ठिकाणी लादिकरण, मंडळाच्या शेडचे काम, नाले सफाई, सार्वजनिक शौचालयाचे काही प्रश्न असतील किंवा इतर अनेक प्रश्न पूर्ण करण्याचे काम त्यासोबतच प्रभाग क्रमांक १२३ मध्ये प्रत्येक विभागात, मंडळात मोफत आरोग्य शिबिरे विविध आजारांवरील शस्त्रक्रिया नागरिकांना मोफत करून देण्याचे काम डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांच्याकडून पूर्ण केले जात आहेत. त्यामूळे प्रभाग क्रमांक १२३ मधील सर्व स्थानिक नागरिकांकडून याविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत डॉ.भारती बावदाने यांना पूर्ण क्षमतेने पाठिंबा देऊन यावेळी निवडून आणण्याचा निर्धार १२३ प्रभागातील सर्व नागरिकांनी केला आहे. याशिवाय रविवार (ता.१२) रोजी हर घर शौचालय योजनेअंतर्गत शिवनेरी सोसायटी, विशाळगड सोसायटी, तोरणा सोसायटी रामनगर (ब) येथे ९ इंचची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा उद्घाटन माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांच्याकडून श्रीफळ वाढवून करण्यात आला. या घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार राहिलेल्या स्वर्गीय शांताराम चव्हाण साहेब यांनी हे काम त्यांच्या कार्यकाळात केले होते. मात्र एवढ्या वर्षानंतर परत पुन्हा ते काम कोणीही केले नव्हते, मात्र प्रथमच हे काम माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने व विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्याकडून पुढाकार घेत पूर्ण केले जात आहे. यावेळी या कामाच्या उद्घाटनवेळी शिवसेना शाखा क्रं.१२३ चे शाखाप्रमुख सुनिल सतबीर सोडा, हरीश मोहिते, राम मंदिराचे अध्यक्ष किशोर कदम, सचिव रविंद्र कदम, शिवसेना महिला शाखाप्रमुख सौ. पूजा पवार व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...