Monday, 20 January 2025

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

**इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

पुणे, प्रतिनिधी : रोजगाराच्या विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्याकरीता भारत आणि इस्राईल देशाअंतर्गत करार करण्यात आहे;  त्यानुसार इस्राईल येथे ‘होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स नॉन वॉर क्षेत्रातील आरोग्य विभागात ५ हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याकरीता https://maharashtrainternational.com  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे.

उमेदवार २५ ते ४५ वयोगटातील असावा, त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असावे. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असावे. 
भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावरील लेटेस्ट जॉब या मथळ्याखाली उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग कॉलेज तसेच आरोग्य विषयात काम करणाऱ्या संस्थांनी रोजगाराच्या संधीबाबत अधिकाधिक उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !! **इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन  पुणे,...