Friday, 14 February 2025

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी, संचालित आंबिस्ते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंबिस्ते, वाडा या शाळेच्या नूतनीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न !!

पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी, संचालित आंबिस्ते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंबिस्ते, वाडा या शाळेच्या नूतनीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न !!

वाडा, प्रतिनिधी : मोतीलाल ओसवाल व सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने आणि अथक परिश्रमाने वाडा तालुक्यातील अग्रनामाकिंत असलेल्या ग्रामीण, दुर्गम आणि डोंगराळ भागात आदिवासी मुलां - मुलीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारी शाळा म्हणजे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी, संचालित आंबिस्ते हायस्कूल, वाडा, जिल्हा पालघर या शाळेचा भूमिपूजन सोहळा दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार) संपन्न झाला. 

या विद्यालयाची स्थापना जून १९६७ मध्ये पूज्यनीय पद्मश्री अण्णासाहेब जाधव (माजी खासदार ) यांनी ग्रामीण विद्यार्थाची शैक्षणिक प्रगती व्हावी व बहुजन वंचित समाज शिक्षण प्रवाहात यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केला होता. तद्नंतर बऱ्याच वर्षापासून या विद्यामंदिरात (इमारतीत ) अनेक विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे घेऊन उच्च पदापर्यंत पोहचले खरे  इमारत मात्र दिवसेंदिवस जीर्ण होत गेली. या विद्यालयाची मोडकळीस आलेली अवस्था व विद्यार्थी हित लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली व सामाजिक बांधिलकी जोपासणारी नामाकिंत सेवाभावी संस्था म्हणजे मोतीलाल ओसवाल फांऊडेशन व सेवा सहयोग संस्था, मुंबई. या संस्थेच्या सन्मा. सुश्री अमिता मॅडम, आदरणीय श्रीम. दिपालीताई देवळे मॅडम व सन्मा.श्री . राम रोकडे साहेब यांच्या चौकस निरीक्षणातून आणि साचेबद्ध योजनेतून या शाळेची इमारत नव्याने उभी करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येऊन पून्हा एकदा या शाळेला सोनेरी दिवस आणण्याचा संकल्प निश्चित करण्यात आला. 

मोतीलाल ओसवाल व सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून व सहकार्यातूनच आज आंबिस्ते येथील शाळेच्या प्रांगणांत सुवर्णक्षणांची सोनेरी किरणे चमकली ती भूमिपूजनाने या भूमिपूजन सोहळ्यासाठी आंबिस्ते हाय. व कनिष्ठ महाविद्यालय आंबिस्ते येथील चेअरमन मा. श्री . जव्हारकर जनार्दन पांडुरंग ( गुरुजी ) यांच्या हस्ते शालेय प्रांगणांत विद्येची देवता सरस्वती व गणेशजी यांच्या मूर्तीचे पूजन करून पद्मश्री अण्णासाहेब जाधव व मातोश्री उषाताई जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर जागेत विधिवत पूजा करून सकाळी ११ : ०० भूमिपूजन करण्यात आले. 

या मंगलप्रसंगी संस्थाध्यक्ष मा. विजयजी पांडुरंग जाधव (अध्यक्ष - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी) मा. जी. आर. पाटील (सरचिटणीस - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिंवडी) मा. संदीपजी पवार, मा. किरणजी सावंत, (काका), मा. जितेंद्रजी सावंत, मा. ॲड. मयुरेश सावंत ( ग्रा पं . सदस्य - आंबिस्ते) मा. प्रशांत जाधव (मुख्याध्यापक - प्राथमिक आश्रमशाळा, आंबिस्ते) मा. दत्तात्रय दाते (मुख्याध्यापक - माध्य. आश्रमशाळा आंबिस्ते) मा. प्रदिप वसईकर (प्राचार्य - आंबिस्ते हाय. व कनिष्ठ महाविद्यालय आंबिस्ते) मा. विशाल सावंत (शिक्षण प्रेमी नागरिक) आधारवर्धिनीचे संचालक मा. विजय पवार व सौ. आदिती विजय पवार दापंत्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे अधिक्षक श्री. पाटील सर व पद्मश्री परिवारातील तिन्ही शाखांचे / शाळांचे सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मयोगी, इ. ५ वी ते इ ११ वी चे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांचे शालेय समितीच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक वृंद याजंकडून पुष्प देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले शिवाय या मंगलमय कार्याची सुरवात भूमिपूजनाने झाल्याने उपस्थितांना पेढे भरवून तर विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक सर्वश्री कोळी सर, ए. जे. जमादार सर, जी. जी. डोहाळे सर, ए. बी. सावळे, एच .आर. भोईर, ए. बी. चागण मॅडम, यु. एस. जाधव मॅडम. यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जे. जमादार सरांनी तर आभारप्रदर्शन डी. बी. कोळी सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...