अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष पदी हरी आल्हाट यांची नियुक्ती ! **अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघचे कार्य क्षेत्र संपूर्ण भारतात आहे.
उल्हासनगर, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्र 'बातमी जनहित' व डिजिटल मिडिया चॅनल 'जनहित न्युज महाराष्ट्र' चे संपादक हरी आल्हाट यांचे पत्रकार क्षेत्रातील कार्य व सामाजिक कार्य हे जाणून घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी केंद्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मनोहरराव सुने यांचेकडे प्रस्ताव मांडला की ठाणे जिल्ह्यात अध्यक्षपदावर हरी आल्हाट यांना पद नियुक्त करावे देशमुख यांच्या प्रस्तावना मंजुरी दिली यानंतर हरी आल्हाद यांची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
हरी आल्हाट यांची नियुक्ती अध्यक्ष मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफभाई खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे, केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी जोशी, केंद्रीय महासचिव सुरेशभाऊ सवळे, केंद्रीय सचिव अशोकराव पवार, केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रविंद्र मेंढे, केंद्रीय कार्यलय प्रमुख बाबाराव खडसे,
केंद्रीय सदस्य माणिकराव ठाकरे, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगिवकर, केंद्रीय सदस्य अंबादास सिनकर, केंद्रीय सदस्य अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, प्रदेश सचिव गोपालराव सरनायक, प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र तिराणिक, प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र माळवे, प्रदेश उपाध्यक्ष संजय देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख लिंबाजी बिडवे, प्रदेश कार्यलय प्रमुख मंगेश राजनकार, प्रदेश संपर्क प्रमुख पप्पू कंधारे, प्रदेश संघटक मनोज कमटे, दत्तप्रसाद आबिलवाडे, प्रदेश प्रसिद्ध प्रमुख शहजाद खान, प्रदेश प्रसिद्ध प्रमुख सागर सवळे, प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नितीन पवार, सौ. जयश्रीताई पडागडे केंद्रीय महिला संघटक, ॲड.सौ.किरणताई भुते (सुने) केंद्रीय विधी सल्लागार, ॲड रेखाताई पाटील प्रदेश विधी सल्लागार सांगली, ॲड किशोर बादल पुणे प्रदेश विधी सल्लागार, अजय टप, प्रदेश संघटक, अरूण महाजन, प्रदेश संघटक, या सर्वांच्या संमतीने करण्यात आली.
संपादक हरी आल्हाट यांचे वृत्तपत्र साप्ताहिक बातमी जनहित तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनेल जनहित न्यूज महाराष्ट्र हे सध्या ठाणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करीत असून आल्हाट यांची ध्येय व उद्दिष्टे म्हणजेच पत्रकारांना न्याय मिळावा पत्रकारांच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, पत्रकारांच्या कुटुंबाला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, पत्रकारांच्या घरांचा प्रश्न सुटावा, पत्रकारांवर होणारे हमले थांबावे, तसेच अनेक समस्या ज्या पत्रकारांच्या हित्ताच्या आहेत. त्या मिळविण्यासाठी हरी आल्हाट ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना सोबत घेऊन हे कार्य करणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात जिल्हास्तरावर पदाधिकारी यांची नेमणूक केली असून 13 फेब्रुवारी 2025 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर तीन प्रेस बाजार या ठिकाणी समस्त ठाणे जिल्हा स्तरावर पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नेमणूक करण्यात आलेले संपादक व पत्रकार , अशोक फकीरा शिरसाट आणि आबासाहेब वाघमारे यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच संजय दामू वाघोदे यांना खजिनदार, विनोद भगवान तायडे यांना सरचिटणीस, एडवोकेट किरण जाधव यांना कायदेशीर सल्लागार, विलास काकडे यांना जिल्हा संपर्कप्रमुख, देवदत्त उघडे आणि बाळकृष्ण आल्हाट यांना सदस्य पदावर नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी हरी आल्हाट म्हणाले की. समस्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास टाकून ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ वाढीसाठी व पत्रकारांच्या मूलभूत सुविधांसाठी मी नेहमीच अग्रेसर असेल अशी गव्हाही दिली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा उद्देश्य असा आहे - महाराष्ट्रात पत्रकारांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे, पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न असो की शासकीय कार्यालयात पत्रकार कक्षातील मूलभूत सुविधा. तसेच साप्ताहिक वृत्तपत्रांना. अनेक वेळा निविदा नोटिसा तसेच जाहिराती पासून वगळल्या जाते यासाठी पाठपुरावा करून हक्कासाठी लढा देणे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत व महाराष्ट्र यामधील पत्रकार यांनी या संघटनेची जुळून पत्रकारांच्या न्याय हक्क व मूलभूत सुविधा यासाठी कार्य करावे असे आवाहन ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी आल्हाट यांनी तमाम संपादक व पत्रकार यांना केले आहे, या कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक राजू तेलकर, संतोष उबाळे, राजकुमार शर्मा, किशोर आल्हाट उपस्थित होते.
No comments:
Post a Comment