रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर्स साईड तर्फे पत्रकारांचा सन्मान !!
कल्याण, बातमीदार - रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड तर्फे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी पत्रकार करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बालक मंदिर सभागृह दत्त आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये २८ पत्रकारांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडचे अध्यक्ष योगेश कोल्हापुरे यांनी रोटरी क्लब करीत असलेले काम, राबत असलेले प्रोजेक्ट याबाबत माहिती दिली. पत्रकार व रोटरी क्लब मिळून एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पत्रकार सुरेश काटे व किशोर पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अभिजीत पवार यांनी मिमिक्री करत राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढत सर्वांचे मनोरंजन केले. योगेश गोडे व मिसेस गोडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
पत्रकारांनी रोटरी सारख्या सामाजिक संस्थेचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे व गरजू समाजाला रोटरीन पर्यंत पोहोचवणे ही आजची गरज आहे या विषयावर देखील चर्चा झाली.
पत्रकार व रोटेरियन अनघा पाटील यांनी कार्यक्रमाचे सुबद्धरित्या नियोजन केले.
No comments:
Post a Comment