पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात वाडा तालुक्यातील विविध समस्यांची जयेश शेलार यांनी दिली निवेदने !!
* ऑनलाइन पीक पाणी न झालेले शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करण्याची प्रमुख मागणी
पालघर, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन गुरुवार (दि. 20) पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी सुमारे विविध विभागांचे 739 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडा तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदने सादर केली आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे पिक पाहणी करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे पिक पाहणी करण्यात आलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने पिक पाहणी सातबारा उतारावर केली आहे. या शेतकऱ्यांची धान (भात) खरेदी करणे शासनाकडून थांबण्यात आले आहे. अशा ऑनलाइन पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांची भात खरेदी करण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला त्वरित मिळावा या मागणीचे निवेदन जयेश शेलार यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. तर भिवंडी - वाडा - मनोर या रस्त्याचे रखडलेले काम व काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक व आवश्यक सूचना असणारे फलक लावावेत व ज्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे अशा ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करावी व रस्त्यावरील खड्डे भरावेत अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे. तसेच वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी कंपन्याची चौकशी करण्याची ही मागणी जयेश शेलार यांनी केली आहे.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या जनता दरबाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या जनता दरबारामुळे विविध समस्या मार्गी लागणे शक्य होणार आहे.
सौजन्य _
जयेश शेलार
अध्यक्ष : राष्ट्रवादी वाडा तालुका संपर्क कार्यालय
No comments:
Post a Comment