कांजुरमार्ग (पुर्व) येथे मराठी भाषा दिनाचे आयोजन !
मुंबई, (पंकजकुमार पाटील) : केंद्र सरकारकडून आपल्या मायमराठी भाषेवर अभिजात भाषेचा शिक्कामोर्तब झालेला आहे. याच मराठी भाषेचा जागर करून मराठी साहित्य, संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम राज्यात साजरे केले जातात.
दि. २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा दिन" म्हणून संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. याच दिवसाचे औचित्य साधून
विक्रोळी विधानसभा आमदार श्री. सुनिलभाऊ राऊत यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, भांडूप - मुलुंड शाखा आणि संतोष क्लासचे संस्थापक श्री. संतोष पासलकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा दिन" रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी सायं. ५.०० वा. नवमहाराष्ट्र व्यायामशाळा, कांजुरमार्ग (पूर्व) येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्राध्यापक श्री. अशोक बागवे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच मराठी गौरव गीत-गौरी मयेकर, वि.वा. शिरवाडकर यांच्या साहित्यावर अभिवाचन- सौ. स्वप्नाली तांबे यांच्याकडून होणार असून सौ. प्राची पाटील, श्री. श्रीकांत शिधोरे, सौ. भाग्यश्री शिधोरे, श्री. रविंद्र केंजळे, सौ. संजना पासलकर व इतर स्थानिक कवींचे कविता वाचन देखील होणार आहे.
तरी या साहित्यिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कोमसाप पदाधिकारी व संतोष क्लासेस कडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment