प्रेममय साने गुरुजी व्याख्यानाचा कार्यक्रम सरळगाव विभाग हायस्कूल विद्यालयात उत्साहात संपन्न !
मुरबाड, प्रतिनिधी : समता विचार प्रसारक संस्था ठाणे यांचे विद्यमाने पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित सरळगाव विभाग हायस्कूल मध्ये साने *गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त* मंगळवार दि.25/02/2025 रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम 18 वा प्रयोग विद्यालयात संपन्न झाला.
समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त प्रमुख व्याख्याते डॉ. संजय मंगला गोपाळ (VJTI) इंजिनियरिंग काॅलेजचे सेवानिवृत्त डीन), लतिका सु.मो मॅडम (विज्ञान /गणित शिक्षिका) तसेच मनीषा जोशी मॅडम (मराठी/स्काऊट गाईड शिक्षिका), मीनल उत्तूरकर (एम.एससी अँनॅलिटीलकल केमिस्ट्री उद्योजक) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सानेगुरुजींच्या जीवनातील संस्कार मय कथा सांगत मानवता हे मूल्य रुजवण्याचा सुरेख प्रयत्न केला गेला तसेच सानेगुरुजी लिखित देशभक्तीपर गाणी, लेख, गोष्टीं यावर आधारीत नाट्यम सांस्कृतिक सादरीकरण करत शालेय वातावरण मंत्रमुग्ध केले गेले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णाताई ठाकरे विचारमंचावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय इधे सर यांनी केले तर विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. ओ. माळी सर यांनी व्याख्यात्यांचे आभार मानत सदर कार्यक्रमाची गरज विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यास मदत होईल असे सांगत देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य _
मुख्याध्यापक
श्री जी. ओ. माळी
No comments:
Post a Comment