"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा !
मुंबई, डॉ विष्णू भंडारे : सिद्धार्थ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने, ११ वी ते १५ वीच्या विद्यार्थ्यांनी आंतर महाविद्यालय, विद्यापीठ व जिल्हा स्तरावर, तसेच कॉलेजअंतर्गत आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीसे मिळवल्या बद्दल 'बक्षीस वितरण कार्यक्रमाचे' आयोजन सोमवार, दि.२४/२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. कॉलेजच्या सभागृहात आयोजित केले होते.
गेल्या वर्षभरात सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात अनेक सुवर्ण रौप्य व कांस्य पदके मिळवलेल्या जवळजवळ १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, डॉ. देविका सुर्यवंशी, डॉ. विष्णू भंडारे, प्रा. छाया पावसकर, प्रा. विशाल करंजवकर, क्रिकेटचे प्रशिक्षक श्री रोहीत भल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यासह त्यांचे पालक व सर्व शिक्षकही उपस्थित होते.
सांघीक खेळ प्रकारात फूटबॉल, क्रिकेट, हॉली बॉल, तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात १०० ते १५०० मीटर धावणे, कॅरम, बुद्धीबळ, पोहणे, भालाफेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, तीन पायांची धावणे शर्यत इत्यादी खेळात भाग घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिके मिळवलेल्या सर्व मुला-मुलींना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह व पदके देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
गेले वर्षभर विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठ तथा जिल्हा स्तरावरील, तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के सरांनी कॉलेजकडून आर्थिक मदत केली. तसेच जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक श्री मंगेश कदम यांनी भरपूर मेहनत घेतली व सतत मुलांसोबत राहुन त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री मंगेश कदमसह, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. कुंदन कांबळे, प्रा. राधा कनकामल्ला, प्रा. सुमेध माने व प्रा. पवन शर्मा इत्यादी शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment