मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर पश्चिमच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन !
घाटकोपर, (केतन भोज) : मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी व पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) घाटकोपर पश्चिम तालुक्यातील बेसिक, महिला, विद्यार्थी, सेवादल, असंघटित कामगार विभाग व सर्व फ्रंटलच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची सभा बुधवार दि.०५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता मार्केट इमारत, विर माता जिजाऊ मनोरंजन गार्डन समोर, एन.एस.एस रोड घाटकोपर पश्चिम मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी या सदर सभेस शिवाजीराव नलावडे (कार्याध्यक्ष मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व सुरेश भालेराव (घाटकोपर जिल्हाध्यक्ष), श्रीमती शालिनीताई गायकवाड (निरिक्षक-घाटकोपर (पश्चिम) तालुका इत्यादी मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार असून या आढावा बैठकीला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन घाटकोपर पश्चिम तालुका अध्यक्ष हिराचंद्र चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment