Monday, 3 February 2025

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे 
 

कल्याण, अतुल फडके :
    आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना  मंत्र , वेद, विद्या, संध्या, स्तोत्र, यांचं काय करायचंय असा संभ्रम आहे. आज सर्वत्र पर्यावरण प्रदूषण यावर विचार केला जातो. शुद्ध उच्चार  विचार व आचार उत्कृष्ट मंत्रोच्चाराने वातावरणाची शुद्धी होते; हे शास्त्रज्ञांनीही मान्य केलं आहे. आपल्या पूर्वजांनी पुढच्या पिढ्यांसाठी निरोगी आयुष्यासाठी संस्कार रुपी ऑक्सिजन प्लांट दिला आहे. आयटीत रहा पण- ऐटीत राहताना आपल्या संस्कृतीचा विसर नसावा ; कारण फांद्या कितीही उंच झाल्या -तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं. असे परखड मत ह भ प श्री. चारुदत्त आफळे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
  
     रविवारी २ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीच्या टिळक नगर शाळेच्या प्रांगणात ब्राह्मण संमेलनाचे आयोजन ब्राह्मण महासंघाने केले होते. त्यावेळी श्री. चारुदत्त आफळे उपस्थितना मार्गदर्शन करत होते. आज सर्वत्र शुद्ध उच्चार -- आचार व विचारांची आवश्यकता आहे, त्या आधारावरच आपण सत्ताधीश नाही- पण किंगमेकर झालो आहोत. भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख ही आपल्या ज्ञातीचे आहेत हे अभिमानास्पदच आहे." असे परखड मत ह भ प श्री. चारुदत्त बुवा आफळे. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले .

". पुरावे नसताना जाती, धर्म, व्यक्तींबद्दल मानहानी करणाऱ्या विरुद्ध राज्य शासनानेच कठोर शासन करण्याची भूमिका घ्यावी; म्हणजे कोणाचाही अपमान न होता सर्वच राष्ट्रपुरुष, सन्माननीय व्यक्ती व सामान्यांचाही मान राखला जाईल; अशी जनहिताची व सर्व समावेशक भूमिका घेणे ही काळाची गरज आहे" अशी सूचना राज्य सरकारला डोंबिवली ब्राह्मण महासंघाने करावी असे श्री .आफळे बुवा यांनी सांगितल्यावर डोंबिवली ब्राह्मण महासंघाने तसा ठराव करून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे ठरले आहे. यावेळी ज्ञातीतील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे पुरस्कार देऊन सत्कारही ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले .

कवी -किरण फाटक व साथीदार यांनी  गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. अध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे , अनघा बोंद्रे, अनिकेत घमंडी, निलेश विरकर, जयंत कुलकर्णी , उल्हास दाते तसेच श्री. माधव घुले, श्री. सुरेश पिंगळे, श्री. राहुल दामले व श्री. मंदार हळबे आदी मान्यवर संमेलनास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे    कल्याण, अतुल फडके :     आज उच्च शि...