Tuesday, 4 February 2025

तीन दिवसीय व्याख्यानमालेचा यशस्वी समारोप !

तीन दिवसीय व्याख्यानमालेचा यशस्वी समारोप !

भांडुप, (पी. डी. पाटील) - भांडुप (पुर्व) येथील सामाजिक विचार मंचातर्फे वैचारिक अशा व्याख्यानमालेचे आयोजन दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत  रात्रौ ७.०० वा. कांजुर को -ऑपरेटिव्ह सोसायटीचे मैदान (क्रॉम्प्टन मैदान) गणेश मंदिरासमोर, दातार कॉलनी, भांडुप (पुर्व), मुंबई या ठिकाणी केले होते. स्वामी विवेकानंद यांच्या सार्थ शताब्दीचा मुहूर्त साधून २०१३ या वर्षापासून या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. तीन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेत निमंत्रित केलेल्या व्याख्यात्यांनी त्यांना दिलेल्या विषयावर आपल्या वकृत्वातून मोलाचे, मंत्रमुग्ध करणारे व नवनवीन असे विचार मांडले.

       यावेळी  शुक्रवार दि. ३१ जानेवारी  रोजी व्याख्यात्या सौ. प्रज्ञा दर्भे *सुखी संसाराचा पासवर्ड*  या विषयावर तर शनिवार दि. १ फेब्रुवारी  रोजी व्याख्याते  डॉ. अशोक बांगर *धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर* या विषयावर आणि रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी व्याख्याते  श्री. मंदार गजानन ओक यांनी  *सर्वधर्म परिषद आणि स्वामी विवेकानंद* या विषयावर आपले विचारपुष्प गुंफले.
  
      विशेषतः या व्याख्यानमालेआधी सकाळच्या वेळेत योगाचार्य श्री शंकर आहेर  यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य आरोग्य -योग वर्ग घेण्यात आले, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर सा. वि. तर्फे विभागातील विविध शाळेत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उपस्थित व्याख्याते व मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हि व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मंचाचे अध्यक्ष बाळशीराम गाडगे, इतर सर्व पदाधिकारी व विशेषतः सचिव संतोष पासलकर यांनी सर्वांशी  उत्तम समन्व्य साधून मोलाचा हातभार उचलला. 
कांजुर भांडुप परिसरातील जवळ पास १५० स्त्री-पुरुष , तरुण तरुणी यांनी  व्याख्यानमालेस उपस्थित राहून या वैचारिक सुवर्णसंधीचा  लाभ घेतला. तसेच विभागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह इतर मान्यवर व्यक्तींनी व्याख्यामालेत हजेरी लावली. सा.वि. मंचच्या सर्व पदाधिकारी -कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन सदर व्याख्यानमाला यशस्वी रित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...