Tuesday, 4 February 2025

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून घरेलु महिला कामगार योजना नांदणी !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून घरेलु महिला कामगार योजना नांदणी !

कल्याण, प्रतिनिधी -‌महाराष्ट्र शासनाची घरेलु महिला कामगार योजना नोंदणी स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, घरकाम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा व त्यांच्या जिवनात हातभार लागावा या उद्देशाने दि.६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी शंखेश्वर प्रेसिडेन्सी, शाॅप न १६, आर.टि.ओ.जवळ, टावरी पाडा, कल्याण प.येथे राबविण्यात येत आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे सह उपस्थित राहून फाॅर्म भरण्यात येणार आहे व पुढील तपासासाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.तरी ज्या महिला घरकाम करत आहेत अशा महिलांनी नक्की या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू महिला कामगार योजने मध्ये आपले नाव नोंदणी करावी असे आवाहन स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी केली आहे.

संपर्क - +91 79777 28435 (बजरंग तांगडकर)

No comments:

Post a Comment

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...!

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...! अकोले, विशाल कुरकुटे -       महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा गल...