Wednesday, 5 February 2025

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...!

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...!

अकोले, विशाल कुरकुटे -
      महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा गलिच्छ कारभारामुळे अकोले ते परेल पर्यंत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासांमध्ये संतापची लाट पसरली आहे मागील दोन ते तीन महिन्यांपासून अकोले ते परेल लालपरी  अचानक बंद करण्यात आली असुन आपले गाव सोडून आपल्या परिवाराचा उदारनिर्वाह करण्यासाठी मुंबई-ठाणे येथील अकोलेकर व शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले सहा ते सात दशक याच गाडीने प्रवास करत पठार भागातील लोकांची विशेषता अकोले, कोतुळ, ब्राह्मणवाडा, बेलापूर, बोटा पंचक्रोशीतील असंख्य गावातील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याची व एकहि दिवस सुट्टी न मारता अकोले आगारावरून परेलच्या दिशेने रवाना होणारी लालपरी कोणतेही सूचना न देता अचानक बंद केली आहे. यामुळे ब्राह्मण वाड्याच्या पूर्वेकडील परिसरातील चैतन्यपूर, बदगी बेलापूर, जाचकवाडी म्हसवांडी, कुरकुटवाडी, आबिफाटा परिसरातील शाळकळी विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अकोले वरून सुटणारी ही गाडी बेलापूर-बोटा आळेफाटा मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होत होती. सदर गाडी पुन्हा चालून झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी व प्रवाशांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...