पंचरत्न मित्र मंडळ, चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळ व स्वामिनी, भवानी, शिवानी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिर सभागृह, वाशीगांव, चेंबुर येथे जागतिक महिला दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री.निरंजन सोनक (संचालक विपणन आर.सी.एफ), मा. श्रीमती नंदा कुलकर्णी मॅडम (मुख्य कार्यकारी संचालक-आर.सी.एफ) उपस्थित होते. तसेच विशेष पाहुणे कु.धनश्री दळवी (सिनेनाट्य अभिनेत्री), श्री. प्रकाश भोसले (शाखा प्रबंधक- सारस्वत को ऑप बँक), डॉ. विनित गायकवाड (टाटा पॉवर कंपनी) आदी मान्यवर लाभले होते. या कार्यक्रमात सौ.सुरक्षा घोसाळकर (संचालिका - फोकस फॅसिलिटी सर्व्हिसेस) यांनी सुजाण पालकत्व तसेच सौ. कविता शिकतोडे (संचालिका - प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्निक) यांनी १०वी, १२ वीच्या विद्यार्थांकरिता करिअर गाईडन्स या विषयावर सर्व उपस्थित महिलांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. पंचरत्न मित्र मंडळातर्फे सर्व महिला भगिनींसाठी विविध खेळांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. उपस्थित सर्व महिलांना मंडळातर्फे भेट वस्तुही देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री.प्रदिप गावंड, रमेश पाटील, मंदार भोपी, डी.एम.मिश्रा, वैभव भाटिया, आर. भगत, विलास कुंभार, रमाकांत गावंड, मॅथ्यू डिसोझा, संदीप पाटील, सौ.निलम गावंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.वैभव घरत यांनी तर आभार प्रदर्शन सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळाला सहकार्य करणारे सर्व देणगीदार, हितचिंतक तसेच आर.सी.एफ प्रशासन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत यापुढेही तुम्हां सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षेसह कार्यक्रमाची सांगता केली.
No comments:
Post a Comment