डोंबिवली येथे आखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार !
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'सन्मान स्त्रीशक्तीचा' सोहळा आखिल भारतीय महासंघाच्या ठाणे जिल्हा कमीटी व डोंबिवली शहर कमीटी तर्फे समाजातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर आखिल ब्राह्मण महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर, टिळकनगर (डोंबिवली) पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम, पोलिस निरीक्षक थोरात, डॉ. मानसी करंदीकर (गायनकोलॉजिस्ट), योगअभ्यास तज्ञ व लेखिका डॉ. धनश्री साने, सौ. विजयालक्ष्मी बोडस आदी उपस्थित होते. ब्राह्मण महासंघाच्या महिला पदाधिकारी यांनी महिलांचे स्वागत केले. डॉ. धनश्री साने व डॉ. मानसी करंदीकर यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. यामध्ये अनुजा रानडे, प्राची कुलकर्णी, संध्याताई पाटील, वर्तक मॅडम, पोलिस अधिकारी भडकमकर, नेत्रा वैद्य, संगीता रानडे, वृषाली दापके, प्रिया साठे, पवार यांचा समावेश होता.
डॉ. मानसी करंदीकर यांनी महिलांना वयोगटानुसार आजार व काळजी यावर मार्गदर्शन केले, डॉ धनश्री साने यांनी महिलांना स्वतःसाठी कसे जगायचे व आनंदी कसे ठेवायचे यांचे मार्गदर्शन केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी महिलांना गुन्हेगारी विषयावर व यात आपण कसे जागरूक रहायचे हे सांगितले. महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर यांनी ब्राह्मण महासंघाची उद्दिष्ट व कार्य यांची माहिती दिली.
संपूर्ण कार्यक्रम आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सुजाता वाळुंजकर, अनुजा रानडे, स्मिता श्रीवत्स, विजयालक्ष्मी बोडस, स्मिता डोरले, संगिता मोहरिल, प्राची भावे यांनी यशस्वीपणे पार पाडला.
No comments:
Post a Comment