Thursday, 20 March 2025

डॉ. दयानंद वासुदेव राणे यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी.) उपाधी प्रदान !

डॉ. दयानंद वासुदेव राणे यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी.) उपाधी प्रदान !

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : वॉशिंग्टन डीसी ( यु.एस ) येथील नामांकित cederbrook university कडून वैदिक वास्तुशास्त्र या विषयातील विशेष संशोधन कार्यासाठी डॉ. दयानंद वासुदेव राणे ( डॉ. आनंदसर ) यांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी (पी.एच.डी. ) उपाधी नुकतीच प्रदान करण्यात आली.

   डॉ. दयानंद व्ही. राणे गेली २३ वर्षांपासून वैदिक वास्तुशास्त्र व वैदिक साहित्य क्षेत्र, संशोधन व प्रशिक्षण यामध्ये कार्यरत आहेत. वैद्यक विषयातील पदवीधर असलेले प्रा.डॉ. दयानंद राणे (आनंदसर) "भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संशोधन संस्था मुंबई®" या संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष असून वैदिक वास्तुशास्त्र व डाउझिंग विषयात हजारो विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत.

    त्यांनी सूक्ष्म स्पंदन विज्ञान व वनस्पती विज्ञान या विषयातील "गंधपरमानू एन इफेक्ट ऑफ ह्युमन बॉडी अँड वास्तु" हा संशोधन प्रबंध लिहिला आहे व त्यासाठी त्यांना सदर पी.एच.डी.मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !! घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी ...