गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी !
पुणे, प्रतिनिधी : भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली असून नोंदणी करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-regitration, या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे ओला, उबेर, रॅपिडो, झोमॅटो, स्विगी, झेपटो, ब्लिंकीट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, अरबन क्लॅप यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment