Tuesday, 25 March 2025

डॉ. किरण राम गावंड यांचा सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा !

डॉ. किरण राम गावंड यांचा सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा !

 ठाणे, (पंकजकुमार पाटील) : रविवारी २३ मार्च रोजी  "काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय" च्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि पुस्तकाचे लेखक डॉ. किरण राम गावंड यांना भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या जतनासाठी "डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी" ही पदवी प्रदान केल्याबद्दलचा अभिनंदन सोहळा आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब (वनमंत्री - महाराष्ट्र, पालकमंत्री पालघर व संपर्क मंत्री ठाणे), मा. खासदार संजीवजी नाईक साहेब, मा. आमदार संदीपजी नाईक साहेब व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल एक्सोटिका रिट्रीट, रॉयल एक्सोटिका, येऊर हिल्स, ठाणे येथे पार पडला.

       इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी गेली ३५ ते ४० वर्षे डॉ. किरण राम गावंड समर्पित भावनेने कार्यरत आहेत. भारतीय तत्त्वज्ञान या विषयावर हजारो व्याख्यान आजवर घेऊन त्यांनी लाखो व्यक्तींच्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची पेरणी करून यशस्वी जीवन जगण्यासाठी त्यांना दिशा दिलेली आहे.
      डॉक्टर किरण गावंड यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘Prowess University, Delaware, USA’ कडून ‘Doctor of Philosophy’ ही सन्मानित पदवी प्रदान करण्यात आली आहे. Prowess University ने डॉक्टर किरण गावंड यांच्या जीवन कार्यावर आधारित इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित करून जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तुमच्या आमच्यासाठी आणि सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
      डॉक्टर किरण गावंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय हे पुस्तक भारतीय संस्कृती, परंपरा, जीवन शैली, वारसा आणि ऐतिहासिक वस्तूंचे गौरवपूर्ण दर्शन घडविणारे पुस्तक आहे.परमपूज्य दादाजी यांच्या प्रेरणेने सुरू झालेले सातारा येथील काशीबाई गावंड संग्रहालयामध्ये भारताच्या दीडशे वर्षाच्या संपन्न वारशाचे दर्शन घडते.
     हजारो इतिहास प्रेमी आणि पर्यटक या संग्रहालयाला भेट देत असतात यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. या संग्रहालयाच्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास डॉक्टर किरण गावंड भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.या संग्रहालयातून माहिती घेऊन जुन्या भांड्यांवरील हस्त नक्षी या विषयावर दोन विद्यार्थी पीएचडी देखील करीत आहेत.
       डॉक्टर किरण गावंड यांनी आयुष्यभर समाजाला देण्याचेच काम केलं. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करतानाच पूर, भूकंप अशा संकटकालीन परिस्थितीत धाडसाने त्यांनी केलेलं मदत कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे.
      काही मंडळी फक्त बोलतात तर काही मंडळी बोलण्याबरोबर कृतीही करतात. डॉक्टर किरण गावंड यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत तर केलेच पण त्याचबरोबर तत्त्वज्ञानावर व्याख्याने, उत्तम आरोग्यासाठी भारतीय योगाचा प्रचार आणि प्रसार असे हजारोंच्या संख्येने कार्यक्रमही घेतले आहेत. समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी एड्सच्या विळख्यात हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाच्या दहा हजारांपेक्षा अधिक प्रति छापून रोटरी इंटरनॅशनलने त्या जगभर वितरित केल्या होत्या.
      भारतीय आपत्ती व्यवस्थापन, भारतीय सर्प विज्ञान, भारतीय आध्यात्मिक मुद्रा महत्त्व आणि उपयोग डॉक्टर किरण गावंड यांची ही काही आगामी पुस्तके लवकरच प्रसिद्ध होणार असून आपल्या सर्वांना या पुस्तकांची उत्सुकता असेल.

2 comments:

  1. Helping hands 🙏🙏

    ReplyDelete
  2. Congratulations for you achievements and All the Best for your future Projects

    ReplyDelete

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !! घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी ...