कल्याण पूर्व येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व* *स्फूर्ती फाउंडेशन, मी मंत्रा संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा संपन्न !
कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण पूर्व गौराई बॅंक्वेट हाॅल येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व स्फूर्ती फाउंडेशन,मी मंत्रा संयुक्त विद्यमाने येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला सन्मान सोहळा शितल मंढारी अध्यक्षा - राणी दुर्गावती आदिवासी मंडळ, शिल्पा बजरंग तांगडकर स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख, श्रृती बाविस्कर मी मंत्रा प्रमुख यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आला होता. विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योजक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला यामध्ये नेहा गायकवाड, रेश्मा खरात,रिना जयस्वाल, निलम व्यवहारे, गीता काळे, चारुशिला पाटील, अमृता सावंत ,भावना आरोटे, हिरा आवारी, मनिषा मोरे, मिनाक्षी पाटील, पूनम जगताप, प्रतिभा वाघचौरे, पुष्पा रत्नपारखी, सुनिता राजपूत, गौतमी माने, रूपिंदर कौर, सागर घेगडमल,संगिता विसपुते,श्रृती बाविस्कर,सिमा सिंग , स्मिता गायकवाड,वैशाली पाटील, वंदना कबाडे,वंदना श्रीवास्तव,वृंदा खरडीकर,विजया जाधव, सुवर्णा राजपुत या मान्यवर महिलांचा महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड, मा.नगरसेवक महेश गायकवाड, मा. नगरसेवक आनंद गायकवाड, स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, उद्योजक रविंद्र कोठावदे, आशिष घोडके नृत्यदिग्दर्शक ,पत्रकार चारूशीला पाटील, अॅडव्होकेट भरत पाटील,आम्ही नगरकर प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश शेळके,पी डब्लू अधिकारी शिंदे ,रुपिंदर कौर ,शिक्षिका विनिषा सदडेकर, स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी गणेश कंडू, आराधना देशपांडे,सोनाली माने ,जानव्ही शर्मा ,उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आले, विविध सांस्कृतिक नृत्य, गायन, मनोरंजन कार्यक्रम स्पर्धा,लकी ड्रॉ, करस्ना लॅब कडून मोफत रक्त तपासणी, महिलांसाठी ईशा नेत्रालय व स्प्रिंग टाईम कल्ब कल्याण तसेच विविध ब्युटी सलून कडून महिलांसाठी मोफत कुपन व बक्षिसांची वितरण आयोजकांकडून करण्यात आली, यावेळी दररोजच्या जीवनातून वेळ काढत महिलांनी गाण्यांचा तालावर नाच करत आनंद लूटला व विविध सांस्कृतिक नृत्य करत महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक शितल मंढारी , शिल्पा तांगडकर, श्रृती बाविस्कर यांनी विशेष मेहनत घेतली व शेवटी उपस्थितांचे आभार मानले
No comments:
Post a Comment