Wednesday, 26 March 2025

पुरोहित, मनुवाद्यांच्या कब्जातून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार केव्हा मुक्त होणार ? - दादासाहेब पी. बी. खडसे (राष्ट्रीय अध्यक्ष - भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा)

पुरोहित, मनुवाद्यांच्या कब्जातून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार  केव्हा मुक्त होणार ? - दादासाहेब पी. बी. खडसे (राष्ट्रीय अध्यक्ष - भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा)

              जम्बूद्वीपामध्ये अडीच हजार वर्षांपूर्वी शाक्य वंशातील सिद्धार्थ गौतम या राजपुत्राला बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले. शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, ते संम्यक सम्बुद्ध अहर्त  झाले.
               सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग करून बोधीअर्थात ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी नानाविध प्रकारचे  प्रयत्न केले. सिद्धार्थ गौतमाचा सत्य शोधण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. सिद्धार्थ गौतमाला दुःख मुक्तीचा मार्ग कळाला आणि सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले ते फक्त स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या त्याग बलिदानाने, स्वतःच्या तपश्चर्याने, स्वश्रमाणे, स्वप्रयत्नाने. सिद्धार्थ गौतम यांनी बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, अन्न त्याग केले, साधना केली आणि मार सेना अर्थात तृष्णेवर विजय प्राप्त करून  शाक्य कुळ वंशाचा राजपुत्र  सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले.
              भगवान, सम्यक, सम्बुद्ध, अहर्त, तथागत बुद्धाने जे ज्ञान मिळविले, जो दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला, जो धम्म शोधून काढला तो बुद्धाचा स्वतंत्र शोध होता.
              संपूर्ण विश्वातील अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, दुःख दूर करण्यासाठी भगवान बुद्धाने पंचवर्गीय भिक्षुंना धम्माची पहिली धम्मदेशना देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले आणि  बुद्धाने आपला धम्म  जनजनांपर्यंत जावा तसेच इतरांना दुःख मुक्तीचा मार्ग  कळावा, निब्बानाचा साक्षात्कार व्हावा यासाठी भिख्खु, भिक्षु  संघ बनविला, भगवान बुद्धाने त्यांच्या भिख्खु संघात स्त्री आणि पुरुष यांना सामावून घेतले. गृहत्याग करून निब्बाण अर्थात निर्वाण, बोधी अर्थात ज्ञान  प्राप्त करण्याचा मार्ग सिद्धार्थ गौतम बुद्धाने सर्वांसाठी प्रशस्त केला, खुला केला. बुद्धाने प्रत्येक  प्राणीमात्रांवर, मनुष्यमात्रांवर करुणा केली आणि त्यांचा धम्म हा,महाकारुनिक बुद्धाने शेवटच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत मांडण्याचा, सांगण्याचा, उपदेशीत करण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ गौतम बुद्ध  यांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला, ज्ञान शोधून काढले, निर्वाणाचा मार्ग शोधला.
              सिद्धार्थ गौतम बुद्धाने या विश्वाला तीन शरण, अर्थात त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण जातो  हे पहिले शरण, मी बुद्धाच्या धम्माला शरण जातो हे दुसरे शरण, आणि मी बुद्धाच्या संघाला शरण जातो हे तिसरे शरण दिले, तथागत भगवान बुद्धाने  उपासक अनुयायांसाठी पाच शील  अर्थात पंचशील दिले. संघातील भिक्खूंसाठी दहा शील दिले. आणि  नियम दिलेत. प्रज्ञा,शील,करुणा चा उपदेश भगवान बुद्धांनी जगाला दिला आहे. सिद्धार्थ गौतम  बुद्धांने स्वतःला मार्गदर्शक म्हणून संबोधलेले आहे.                
             सिद्धार्थ गौतम बुद्ध हे या विश्वाला मिळालेली  अनमोल देणगी आहे. बुद्धाचा जन्म, बुद्धाला ज्ञान प्राप्ती आणि बुध्दाचे महापरिनिर्वाण या  भारत वर्षामध्ये, जम्मूद्वीपामध्ये  झाले. भारत ही बुद्धाची भूमी आहे. भगवान बुद्धाचा धम्म,धम्ममार्ग  भारताच्या भूमी बाहेर अनेक राष्ट्रांनी अंगीकारला,स्वीकारला. या  विश्वातील अनेक राष्ट्र हे बुद्धाचे अनुयायी झालेले आहेत.
            सिध्दार्थ गौतम बुद्धाला ज्या  बोधगया  येथील पिंपळ वृक्षाखाली  ज्ञान प्राप्त झाले त्या ठिकाणची, सत्याची साक्ष तेथील बोधीवृक्ष आजही  देत आहे. प्रियदर्शी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बांधले. प्रियदर्शी सम्राट अशोकाने त्याच्या शासन काळात 84 हजार स्तूप, बुद्ध विहार सुद्धा बांधले,  84 हजार बुद्ध विहार आजही भारत वर्ष अर्थात भारतात, वेगवेगळ्या विहार मंदिरा च्या स्वरूपात अस्तित्वात आहे, अनेक ठिकाणी बुद्ध मूर्तीला भट पुरोहितानी पोटा पाण्याच्या साधनासाठी वैदिकवादी कथित देवी देवता बनवून, बुद्ध संपदेला विद्रुप करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे पण भट ब्राम्हण, पुरोहिताना बुद्ध लपवून ठेवता आला नाही, बुद्ध सूर्या प्रमाणे वास्तविकतेला, इतिहासाला सत्याला प्रतिबिंबित करत आहे.बुध्दाचे अस्तित्व, बुध्दाचे सत्य, बुद्धाचा धम्म आजही सूर्य प्रकाशाप्रमाणे झळझळत आहे, दिपवत आहे.
              प्रियदर्शी सम्राट अशोकाने बांधलेले बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे आजही जगाला सम्यक, सम्बुद्ध, अहर्त  सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म, बुद्ध विचार, बुद्ध तत्त्वज्ञान, धम्ममार्ग, बुद्ध इतिहास  यांची ग्वाही देत जगातील बुद्ध अनुयायांना, बौद्ध धम्म बांधवांना  आकर्षित करीत आहे. भारतातील बिहार  राज्यातील गया स्थित महाबोधी बुद्ध विहार  हे धम्म  प्रेरणेचे आणि जगातील बौद्ध अनुयायांचे पवित्र श्रद्धास्थान आहे. असे असताना भारतातील वैदिकवादी भट, ब्राह्मण, पुरोहित, मनुवाद्यांनी चोरट्या मार्गाने, कपटनीती आणि षडयंत्राने  बुद्धाच्या धम्मामध्ये, बुद्ध साहित्यामध्ये    घुसखोरी करण्याचा प्रयत्न भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते अद्याप पर्यंत सुरू ठेवलेला आहे. हे मनुवाद्यांचे बुद्ध धम्म आणि बुद्धाच्या संघा विरोधी कृत्य आहे.
प्रियदर्शी सम्राट अशोकाने बांधलेल्या बोधगया स्थित  महाबोधी बुद्ध विहार  या बुद्ध मंदिर वास्तु शिल्पाशी, वैदिक भट ब्राह्मण पुरोहितांचा कुठलाच संबंध नाही. बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे  भारतातील आणि विश्वातील बौद्ध अनुयायांची धरोवर आहे. धम्माची धरोवर आहे.
              तेव्हा वैदिकवादी भट ब्राह्मण पूर्रोहितांनी बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार  येथे घुसखोरी करू नये.  भगवान बुद्ध यांच्या  बुद्ध धम्म धरोवरेला विद्रूप करू नये.
               विद्यमान भारत सरकारने तसेच विद्यमान बिहार राज्य सरकारने बोधगया टेम्पल ऍक्ट 1949  कायमस्वरूपी रद्द करून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध धर्मीय अनुयायांच्या, बौद्ध भिक्षूंच्या  विना विलंब ताब्यात द्यावे.
भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे एवढा अफाट काळ लोटून गेलेला आहे.
              विश्वरत्न,महामानव, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  या स्वतंत्र भारत देशाला भारताचे संविधान बहाल केले.  भारतीय संविधानाने  भारतातील प्रत्येकाला उपासनेचे धर्म स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. भट ब्राह्मण  पुरोहितांचा कुठलाही संबंध बुद्धगया स्थित महाबोधी बुद्ध विहाराशीं नसताना  बोधगया टेम्पल ऍक्ट 1949  तातडीने रद्द होणे गरजेचे आहे.
              स्वातंत्र्यानंतर भारतातील करोडो बौद्ध अनुयायी हे  मनुवाद्यांच्या, जातीयवाद्यांच्या अन्याय, अत्याचार, शोषण, अंधश्रद्धेला बळी ठरत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
भट,ब्राह्मण पुरोहित मनुवाद्यांच्या जाखडातून महाबोधी बुद्ध विहार केव्हा मुक्त होणार? असा भीषण प्रश्न भारतातीलच नव्हे तर विश्वातील बौद्ध अनुयायांना पडला आहे. जर महाबोधी बुद्ध विहार तातडीने मुक्त झाले नाही तर, बुद्धगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात त्वरीत मिळाले नाही तर  विशाल, विराट स्वरूपामध्ये  विश्वातील बौद्ध अनुयायांची जनआंदोलना ची मशाल पेटतच राहील यात दुमत नाही.

            आता तात्काळ भारत सरकारने आणि बिहार राज्य सरकारने बुद्धगया टेम्पल ऍक्ट 1949 कायदा  तातडीने रद्द करून बोधगया स्थित महाबोधी बुद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या आणि बौद्ध भिक्षूंच्या विनाविलंब ताब्यात द्यावे. आणि या पुढे  निरंतर, बुद्ध धम्माच्या मार्गावर चालण्यातच, बुद्ध धम्माला अनुसरण्यातच समस्त मनुष्यमात्राचे राष्ट्राचे तसेच विश्वाचे कल्याण आहे.

लेख __
____________________________________
श्री.दादासाहेब  पी. बी. खडसे
राष्ट्रीय अध्यक्ष-भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चा,
रा. अमरावती, महाराष्ट्र
mob. 9960888011
ई-मेल-irp.morcha@gmail.com


 

No comments:

Post a Comment

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !!

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !! *** आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश!   मुरबाड, प्रतिनिधी - कल्...