मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनी शृंगारतळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; सर्व समाज घेणार सहभाग !!
** मनसेचे प्रमोदजी गांधी यांचा सामाजिक सौख्य राखणारा स्तुत्य उपक्रम
गुहागर - ( दिपक कारकर )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून एकोणिसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत, गुहागर मतदार संघात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सातत्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करणारे मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी भवानी सभागृह, पालपेणे रोड, शृंगारतळी येथे सकाळी ०९ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत, भव्य रक्तदान शिबीर तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात येणार असल्याचेही गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सांगितले, सदर रक्तदान शिबिरात गुहागर तालुक्यातील सर्व समाज व विविध संघटना सहभाग घेणार असल्याचेही प्रमोद गांधी यांनी अधिक माहिती देताना सांगितले, जास्तीत जास्त तरुण, तरुणींनी सदर शिबिरात आपला अनमोल सहभाग नोंदवून सामाजिक हेतू ,राष्ट्रसेवा हितार्थ मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन उद्योजक तसेच मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केले आहे. सदर उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी राहुल जाधव - ८९७५३४८१२३ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन गुहागर मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment