Saturday, 29 March 2025

स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाची बाजी !

स्वच्छ भारत अभियान २.० मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाची बाजी !

विरार, पंकज चव्हाण - वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० आणि स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता जनजागृतीच्या संदर्भात स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन आणि शासकीय स्पर्धांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केलेले आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मुग्धा लेले, श्रीमती कल्पना राऊत, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, प्रा. रमेश पाटील आणि प्रा. हेमा पाटील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वय समितीचे सदस्य यांनी अनमोल असे मार्गदर्शन केलेले होते . ‘ स्वच्छ भारत - सुंदर भारत’ ही काळाची गरज असल्याचे मत प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर आणि संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !! घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी ...