Saturday, 29 March 2025

आंबेडकरी चळवळीतील संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी. बी. खडसे यांचे योगदान व कार्य अतुलनीय - माजी नगरसेवक श्री सुरेश मेश्राम

आंबेडकरी चळवळीतील  संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी. बी. खडसे यांचे योगदान व कार्य अतुलनीय -  माजी नगरसेवक श्री सुरेश मेश्राम 

अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या 25 ते 30 वर्षापासून दलित पँथर,जागतिक बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चा, प्रेस संपादक व पत्रकार संघ, आदी आंबेडकरी संघटनांचे  नेतृत्व करत सतत आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे कार्य करणारे आंबेडकरी चळवळीतील संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी.बी. खडसे यांचे सामाजिक कार्य व योगदान अतुलनीय असेच आहे असे मनोगत माजी नगरसेवक श्री. सुरेश मेश्राम यांनी भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी. बी.खडसे यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये दिनांक 29मार्च रोजी, दुपारी 1वा. स्थानिक इर्विन चौक येथे मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आनंद हिवराडे गुरुजी हे होते. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूज्य भन्ते मनोरथ यांनी  उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी निर्भीड पत्रकार तसेच   भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दादासाहेब पी. बी.खडसे  यांच्या जीवनावर  आणि कार्यावर प्रकाश टाकणारे  मनोगत उपस्थित वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

आंबेडकरवादी रिपब्लिकन चळवळीचे सरसेनापती, तसेच निर्भीड पत्रकार, दैनिक लोकतंत्र नायक मुख्य संपादक, प्रेस पत्रकार संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, झुंजार पॅंथर  श्री. दादासाहेब पी. बी. खडसे  यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव करत त्यांना शाल व पुष्प गुच्छ देऊन  त्यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्याचा गुणगौरव म्हणून कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी याप्रसंगी  संघर्ष नायक श्री. दादासाहेब पी.बी. खडसे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाला महानायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक श्री. सुरेश मेश्राम, भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री .मनोज ढवळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. आनंदराव हिवराडे गुरुजी, न्याय अधिकार सभेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट पृथ्वीसम्राट दीपवंश, प्रसिद्ध आंबेडकरी कवी व गायक श्री. प्रकाशदीप वानखडे, दलित पॅंथरचे राष्ट्रीय सचिव श्री. प्रदीप महाजन,  सातबारा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री.अजय मंडपे, रवींद्र इंगळे, प्राध्यापक श्री खंडारे सर, भीमसेनेचे श्री.नंदकिशोर पाटील, दलित पॅंथर चे नेते भाऊसाहेब वाहने,श्री.दिनेश गाजवे, डॉ. नीलम रंगारकर,कास्ट ट्राईब संघटनेचे नेते श्री. व्ही. वानखडे, श्री. मिलिंद कांबळे, श्री.रंजन घरडे, श्री.प्रवीण मंडे,
 यांचे सह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.
------------------------------------------------
 प्रेषक -
श्री. सुरेश मेश्राम
 संस्थापक अध्यक्ष- महानायक संघटना महाराष्ट्र राज्य
mob. 9022508746
-------------------------------------------

No comments:

Post a Comment

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !!

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण, इंदिरानगर ...