Sunday, 13 April 2025

कल्याण मध्ये रंगला नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धचा थरार !

कल्याण मध्ये रंगला नगरकर  प्रिमियर  क्रिकेट लिग स्पर्धचा  थरार !

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आम्ही नगरकर मुंबई संघ (कर्णधार - बजरंग तांगडकर),‌ आम्ही नगरकर राजस्थान रॉयल्स (कर्णधार -मंगेश शेळके), आम्ही नगरकर चेन्नई सुपर किंग (कर्णधार-नितिन भराट), आम्ही नगरकर कोलकत्ता नाईट रायडर (कर्णधार-विक्की फापाळे), आम्ही नगरकर हैदराबाद किंग्ज (कर्णधार-अमोल शिंगोटे) संघांनी सहभाग घेतला असा एकूण आठ टीम ने सहभाग नोंदविला होता.

आम्ही नगरकर दिल्ली कॅपिटल प्रथम विजेता (विरेंद्र जाधव कर्णधार), सुशील खरे, धीरेंद्र जाधव, मिलिंद रोकडे, सचिन घुले, विशाल मोरे, संतोष सोनवणे तर दुसरे विजेता आम्ही नगरकर पंजाब किंग (प्रशांत आहेर कर्णधार), करण कुऱ्हाडे, अजिंक्य गायकर, अमित आहेर, निलेश गायकर, विकास काळे, संदेश भोर आणि तृतीय विजेता आम्ही नगरकर राॅयल चॅलेंज बॅंग्लोर  (शांताराम झावरे कर्णधार), प्रवीण सोमवंशी, सुनील  तांगडकर, प्रदीप सोमवंशी, राहुल वाढवणे, साई फापाले, श्याम जाधव हे संघ विजेते ठरले.

उत्कृष्ट फलंदाजी मध्ये प्रवीण सोमवंशी, प्रदीप सोमवंशी बंधुना संयुक्त पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज सुशिल खरे तर 
मालिकावीर अजिंक्य गायकर यांनी पारितोषिक पटकावले
अतिशय थरारक व रोमांचक क्रिकेट सामने पार पडले.

जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर  व आम्ही नगरकर प्रतिष्ठान संचालक मंडळ मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, तानाजी करपे, प्रशांत आहेर, विक्की फापाळे, विरेंद्र जाधव, नितिन भराट यांच्या शुभहस्ते नारळ फोडून स्पर्धा शुभारंभ झाला, स्पर्धाला स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख व व्हि एस फॅमिली सलून रौनक सिटी कल्याण च्या प्रोपायटर शिल्पा तांगडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पहिल्या सामन्याचे नाणेफेक उडवत सर्व नगरकर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

आम्ही नगरकर मुंबई संघ चे मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, प्रशांत आहेर, विरेंद्र जाधव, विक्की फापाळे, तानाजी करपे, हिरा आवारी, रामनाथ भोजने, अमोल वाकळे, नितिन भराट, वतीने विविध मान्यवरांचे स्वागत व विजेता टिम पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसा (लि.) मुंबई यांच्यातर्फे कोकण सुपुत्र, उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबळे यांचा सत्कार !

दी.हायकोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसा (लि.) मुंबई यांच्यातर्फे कोकण सुपुत्र, उच्च न्यायालयाचे कर्मचारी समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबळे या...