Sunday, 13 April 2025

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा (महाराष्ट्र राज्य) परिवार यांच्यावतीने ३५ वा उपक्रम पुणतांबा येथील मेथडिस्ट होमचे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच वॉशिंग मशीन, जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गोंडेगावचे लोकप्रिय माजी सरपंच संभाजीराजे बढे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुहास वहाडणे, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी उपस्थित होते. मायेची सावली परिवार संस्थापक अध्यक्ष कटृर निष्ठावंत शिवसैनिक यशवंत विठ्ठल खोपकर व त्यांचे सर्व सहकारी कट्टर निष्ठावंत शिवसैनिक बंधु भगिनी यांच्या अथक प्रयत्नातुन अशा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पुणतांबा येथील मेथडिस्ट चर्च‌ मधील फादर जॉन प्रिंटर यांच्या उपस्थितीत बाल गोपाल अनाथ आश्रम येथे वरील सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा.वाकचौरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुणतांबा शहर शिवसेनेचे व मायेची सावली परिवाराचे कौतुक करत आपण भविष्यात या अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करु. या सेवेत मी सदैव आपले पाठीशी तत्पर उपलब्ध राहील असे सांगितले. यशवंत खोपकर (मायेची सावली एक हात कर्तव्याचा (संस्थापक अध्यक्ष), संदिप चादिवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी (कार्यालय प्रमुख), विश्वनाथ जाधव, वैभव डोके, मेघा सावंत, निर्मला आवटे, रूपाली डोके, अपूर्वा पारकर, राजेंद्र पेडणेकर, राजेंद्र मणसुख,दत्तात्रय काशीद, अर्णव सावंत, अर्णव खोपकर, लिखित डोके यांच्यासह अन्य मायेची सावली सावलीचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. तसेच मायेची सावली पदाधिकारी या सर्वांचा खा.वाकचौरे साहेब यांच्या हस्ते  संस्थेचे संस्थापक यशवंत खोपकर तसेच पदाधिकारी या सर्वांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

भारतात पहिल्यांदाच जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन ठाण्यातील गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचे !!

भारतात पहिल्यांदाच जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन ठाण्यातील गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचे !! ***धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकाम 12 व्...