महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त कामगार पुतळ्याला मानवंदना !!
अंबरनाथ, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ में १९६० रोजी करण्यात आली तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर १ मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो, सालाबादप्रमाणे कष्टकरी व कामगारांचे प्रतिक म्हणून अंबरनाथ शहरांतील मोरीवली गार्डन येथे उभारण्यात आलेल्या कामगार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
बंजारी वस्ती येथे आजच्या दिवसी बंजारा संस्कृतीची ओळख राहावी म्हणून बंजारा संस्कृती दिन साजरा करण्यात येतो, कष्टकरी समाज हा विकासाचे द्योतक असून समाजाचे योगदान भारत भूमीच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे, इतिहासात ज्या बंजारा समाजाची नोंद रसद पोहचविण्याचे काम करीत असत अशी आहे, जुन्या काळातील अवघड मार्गातून वाट काढत रसद पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम बंजारा समाज करत होता. आपले योगदान अधोरेखित करण्यासारखे जरी असले तरी आजपर्यंत कुठल्याही शासनाने यांची दखल घेतली नाही अशी खंत याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केली.
बंजारा समाजाला आपल्या समाजाने सर्वोच्च शिखर गाठले पाहिजे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक प्रा धनराज दशरथ डांगे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष रोशन जाधव, सचिव मनीलाल डांगे, बंजारा मित्र मंडळ चे पदाधिकारी श्याम डांगे,अरूण जाधव,शिवा डांगे,संजय डांगे, देवा जाधव, महेश डांगे, प्रशांत जाधव, रूपेश जाधव, जतिन डांगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment