नोकरीबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच !!
कोकण, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कोंडगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला नोकरी करता करता आपल्या कलागुणांनी विविध स्पर्धा गाजवलेला अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच राहिला. प्राथमिक शिक्षण कोंडगाव येथे पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर गाठलं. शिकता शिकता शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव दिला. बघता बघता कोल्हापूर सांगली सातारा अशा ठिकाणी यश संपादन करून पारितोषिके मिळवली. कोल्हापूर श्री सारखा बहुमान मिळवीला. बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले. असा हा गुणी प्रतिभावान बुद्धिवंत प्रसिद्धीपासून दूर राहिलेला युवक मुबंई येथे अभिलेखा विभागात कार्यकारी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. त्याची शैक्षणिक पात्रता तर थक्क करणारी आहे. त्याची शैक्षणिक पात्रता बी.एस सी केमेस्ट्री शाहू कॉलेज कोल्हापूर, बी.ए इंग्लिश महावीर कॉलेज कोल्हापूर, एम.ए इंग्लिश नाईट कॉलेज कोल्हापूर, बी.एड कराड कॉलेज अशी त्याची शैक्षणिक पात्रता असून कोणतेही प्रसिद्धीचे वलंय नसलेला गुणवंत बुद्धिवंत प्रतिभावंत अनिकेत लिंगायत प्रसिद्धीपासून दूरच राहिला. मात्र त्याच्या या योगदानाबद्दल अनेकांनी अनिकेत यास सलाम केला आहे. तर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment