भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील भांबेड गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वाघजाई तरुण विकास मंडळ- नार्डेकरवाडी (रजि.क्र.जी.बी.बी.एस.डी. ९७८) तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिन आणि श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन वैशाख शु.१४, रविवार दि. ११ मे २०२५ रोजी मु.पो.भांबेड (नार्डेकरवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की, शुक्रवार दि.९ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता वाडी मर्यादित किर्केट चे सामने, शनिवार दि १० मे २०२५ रोजी दुपारी ३ वा.महिलांसाठी हळदी -कुंकू आणि रात्री ९ वा.लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स / नाटक तर रविवार दि.११ मे २०२५ रोजी स. ५ ते ६ वा.काकड आरती, स.९ ते ११ वा. सत्यनारायण महापुजा, ११ ते १२ वा. सार्वजनिक आरती, दु.१२ ते २ वा. महाप्रसाद (भंडारा), दु.३ ते ६ वा. सांस्कृतिक स्पर्धा, संध्या.६ ते ७ वा. आरती, रात्री ७ ते ८ वा. सुसंगीत भजन, रात्री ९ ते १० वा. गुणगौरव व सत्कार समारंभ, रात्रौ १०.०० वा. लोकनाट्य बहुरंगी नमन-सोबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे, गवळीवाडी वग नाट्य - राज गादिचा लालसा (सख्खा भाऊ पक्का वैरी)चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रम साठी स्वागतोत्सुक म्हणून श्री. देवराम पांडुरंग नार्डेकर (वाडीप्रमुख), श्री. सुरेश मनोहर मोसमकर (अध्यक्ष), श्री.सुनिल शांताराम नार्डेकर (सचिव), श्री.योगेश उमाजी नार्डेकर (खजिनदार) आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, वाडीतील सर्व महिला-पुरुष, युवक-युवती, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद तसेच किलबिल कंपनी सज्ज रहाणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमचा गावातील नागरिक, माहेरवाशिनी, पाहुणे मंडळी यांनी लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण श्री वाघजाई तरुण विकास मंडळ - नार्डेकरवाडी, समस्त मुंबई व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे. सर्व सन्माननीय देणगीदार आणि हितचिंतक यांचे मंडळने आभार व्यक्त करत आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा (भंडाऱ्याचा) लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment