Saturday, 10 May 2025

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर बोकाळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिले असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरुच आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात मुरली नाईक या भारतमातेच्या जवानाला वीरमरण आले आहे.घाटकोपर कामराज नगर येथील जुने कार्यकर्ते श्री.राम नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र जवान मुरली नाईक हे घाटकोपर कामराज नगर येथील रहिवाशी आहेत.पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना गुरुवार दि.०९ मे २०२५ रोजी पहाटे ३:०० वाजता ते शहीद झाले.भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने भारतात हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून गुरुवारी  जम्मू-काश्मीरमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान मुरली नाईक हे शहीद झाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जवान मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच घाटकोपर परिसरात शोककाळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य मुंबई, (शांताराम गुडेकर) :             ...